मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : 'काही वेळा तर बोहणी देखील होत नाही', डिजिटल युगात पेंटिंग व्यवसाय मोडीत

Video : 'काही वेळा तर बोहणी देखील होत नाही', डिजिटल युगात पेंटिंग व्यवसाय मोडीत

X
डिजिटलच्या

डिजिटलच्या जमान्यात मागील अनेक वर्षांपासून पेंटिंग व्यवसायाचे काम करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

डिजिटलच्या जमान्यात मागील अनेक वर्षांपासून पेंटिंग व्यवसायाचे काम करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

    सातारा, 03 नोव्हेंबर : हात पेंटिंगची प्रथा सध्याच्या डिजिटल युगात मोडीत निघत आहे. पेंटरचा धंदा हा संपलाच आला आहे. पूर्वी कामातून वेळ मिळायचा नाही. आता परिस्थिती बदलली असून कामच मिळत नाही. दुसरा व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही. पेंटिंगच्या व्यवसायात तीस वर्षे गेली. दुसरा व्यवसाय उभारायला पाच वर्षे लागतील. आता आयुष्यही तेवढे राहिले नाही ही व्यथा आहे पेंटर विलास माने यांची. डिजिटलच्या जमान्यात मागील अनेक वर्षांपासून साताऱ्यात  पेंटिंग व्यवसायाचे काम करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे

    पूर्वी एखाद्या दुकानाच्या नावाचा बोर्ड लिहायचा असो किंवा नवीन गाडीची नंबर प्लेट रंगवायची असो, पेंटरच्या दुकानात जावं लागायचं.  पण, गेल्या काही वर्षात डिजिटल प्रिंट, अकॅरॅलीक प्लेट वाढल्यामुळे दुकानाच्या बोर्डाची जागा बॅनर, फ्लेक्सने घेतली, गाडीच्या नंबर प्लेटवर रेडीयमची चमकदार आकड्यांची नक्षी आली. यामुळे रंगकाम करण्यात हयात गेलेल्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली.

    विलास माने यांनी पेंटर काम शिकून दुकान थाटले. पेंटरचा व्यवसाय जोरात चालत होता. दिवसाला हजार बाराशे रुपये मिळून जायचे. परंतु, मागील तीनचार वर्षापासून डिजिटल प्रिंटिंग वाढल्याने रंगकाम कमी झाले आहे. आता दिवसाला 200 ते 300 रुपये मिळणे देखील कठीण झाले आहे. काही वेळा तर बोहणी देखील होत नाही.

    घर कसं चालवावं? 

    दसरा, दिवाळीची धामधूम  झाली. दुकानाला फ्लेक्स बोर्ड लागले. मात्र आमचा विसर नागरिकांना पडला आहे. तसेच प्रत्येक जण घराच्या स्वच्छतेच्या तयारीला लागला होता. पण पूर्वी साफसफाईसोबतच रंगरंगोटी देखील होत असे. आता मात्र रंगकाम करून घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 'गेल्या महिन्यात घर रंगवण्याचं काम मिळालं होतं. त्यानंतर एकही काम मिळालं नाही. माझा सात जणांचा परिवार आहे. रंगकाम करून चार-पाच हजार मिळतात. यात घर कसं चालवावं? असंच सुरू राहिलं, तर हा व्यवसाय सोडून दुसरा धंदा करावा लागणार आहे. असं पेंटर विलास माने यांनी भरल्या आवाजात सांगितले. सध्या धंद्यात खूप मंदी आली आहे. मी सकाळी आठ वाजता आलो. संध्याकाळपर्यंत फक्त 150 रुपये मिळाले आहेत.

    Video : बहरलेल्या द्राक्ष बागेची बोली लागली, भावही ठरला! पण रात्रीत…

    सर्वत्र डिजिटल बॅनरचाच वापर

    लग्न समारंभात घरावरती चित्र काढणे तसेच वधू -वरचे नाव लिहिणे, आडनाव लिहिणे, स्टेजच्या पाठीमागे बोर्ड तयार करणे, या गोष्टी होत होत्या, मात्र या ठिकाणी देखील थर्माकोल आणि बॅनरने जागा घेतली आहे. निवडणुकीत कापडी पडद्याचे बोर्ड करण्याची पद्धत बदलली आहे. व्यवसाय भरात होता तेव्हा दिवाळीची अंघोळ सुद्धा करण्यासाठी वेळ नसायचा. आता मात्र कसली दिवाळी, पूर्ण दिवाळ निघालं असल्याच माने सांगतात.

    नवीन रंगाने गेला, धंद्याचा रंग

    सध्या बाजारात नवनवीन रंग आले आहेत. यात काही महाग रंग असे आहेत, की एकदा घराला तो रंग दिला, की सात आठ वर्ष तरी रंग देण्याची गरज पडत नाही. असे महागडे रंग वापरणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. या नवीन रंगांमुळे आपल्या धंद्याचा रंग गेला असल्याचे पेंटर सांगतात. पेंटर व्यवसायातील अनेक चांगले कलाकार आता इतर व्यवसायाकडे वळले आहे. काही मजुरी करतात, तर काही कंपनीमध्ये कामाला जातात.

    First published:

    Tags: Satara, Satara news, सातारा