सातारा, 20 डिसेंबर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता मतमोजणी सुरू आहे. निकालाचे पहिले कल हातात येत आहे. साताऱ्यातील कराडमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहे. शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाईंना पहिला धक्का बसला आहे. सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादीचा झाला आहे. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा पराभव झाला आहे. सातारा जिल्ह्यातील किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवत भाजपा आणि शिंदे गटाला धुळ चारली आहे. तर, चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून १० जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी गटाला ३ जागांवर समाधान तर सरपंचपदी देवदत्त माने हे निवडुन आले आहेत. तर दुसरीकडे, कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभुराजे देसाई आणि अॅवोकेट उदयसिंह पाटील_ उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या असून सरपंच पदावर राष्ट्रवादी गटानं २ मतानं विजय मिळवला आहे.शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आहे. तर, कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय मिळवला आहे. (भाजपच्या बैठकीत शिंदेंचं टेन्शन वाढवणारी घोषणाबाजी! बावनकुळेंच्या विधानानंतर आता…) तर बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे राज्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत बीड जिल्ह्यामध्ये होत असल्यानं जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची प्रतिष्ठान लागली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे याबरोबर क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठापना लागलेल्या निवडणुकीत नेमका मतदार कोणाला कौल देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात तब्बल 91 टेबलांवर आज ही मतमोजणी होत आहे.जिल्हा परिषद पंचायत समितीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाला मतदारांनी कौल दिला हेही स्पष्ट होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात 735 उमेदवारांच्या माघारी नंतर तब्बल 1545 उमेदवारांचे भाग्य हे रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम बंद झाले होते.. त्यामुळे आज या संपूर्ण 261 ग्रामपंचायतचे निकाल हाती येणार आहे. त्यामुळे ग्राम पातळीवर या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.