सातारा, 24 ऑक्टोबर : जिल्ह्यातील विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळा सध्या चर्चेत आहे. शाळेत अनेक अभिनव प्रयोग केले जातात. शाळेतील प्रयोगशील शिक्षक बालाजी जाधव यांच्या कल्पकतेने शिक्षणात नावीन्यपूर्ण बदल घडत आहेत. 3 वर्षापूर्वी 10 पट संख्या असणाऱ्या शाळेत आज आजूबाजूच्या गावातून विद्यार्थी येऊ लागले आहेत. बालाजी जाधव हे एकमेव शिक्षक 4 वर्गांना अध्यापन करतात. मजूर, मेंढपाळांच्या मुलांना जागतिक स्तरावरचं शिक्षण या शाळेत मिळत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर ही दुर्गम भागात असणारी शाळा आहे. मजूर, मेंढपाळ, रंगकाम करणारे पालकांची मुले येथे पुस्तकी शिक्षणासोबत कौशल्य शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी स्वतः कोरफडी पासून साबण बनवतात, वरळी चित्रे शाळेच्या भिंतीवर रेखाटतात, घड्याळ बनवतात, दुरुस्ती करतात, झाडाच्या फांद्यापासून धनुष्य बाण बनवून चालवतात, टॅब वर पियानो वादन करतात. या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण बालाजी जाधव विद्यार्थ्यांना देतात.
ग्रामीण विद्यार्थ्यांना ग्लोबल शिक्षण
शाळेत विविध सॉफ्टवेअर व अँपच्या साह्याने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडे दिले जातात. ग्रामीण विद्यार्थ्यांना ग्लोबल शिक्षण मिळत आहे, देश विदेशातील शाळांशी व्हर्च्युली कनेक्ट होऊन जाधव सर अभिनव शिक्षण देतात. यामुळे मुले विविध क्षेत्रात निपुण होत आहेत.
Video : हाताशी आलेलं पिक पावसानं झोडपलं, ऐन दिवाळीत शेतकरी संकटात
नियमित भाषा गणित, इंग्रजी सोबत आधुनिक शिक्षणातील प्रयोग जसे अग्यूमेंटड रियालिटी, क्यू आर कोड, फ्लिपबुक, स्टोरी टेलिंग करून भविष्यात लेखक, वार्ताहर, अँकर होण्याच्या मार्गावर विद्यार्थी आहेत. हे शिक्षणाचे मोठे परिवर्तन होत आहे. या सर्व बाबीचे सादरीकरण व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भेटवस्तू महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना देऊन संवाद साधण्याची संधी शाळेतील विद्यार्थ्यांसह जाधव सरांना मिळाली.
10 विद्यार्थ्यांसह जाधव सरांनी घेतली राज्यपालांची भेट
शाळेतील अभिनव उपक्रमामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राजभवन मुंबई येथे 10 विद्यार्थ्यांना निमंत्रण दिले व जाधव सर यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेऊन गोरगरीब मजूर पालकांची मुले राजभवनात नेऊन राज्यपाल यांच्याशी संवाद साधण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. राज्यपाल यांनी सुद्धा मुलाशी मनमोकळा संवाद साधून मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Satara, Satara news, Student, सातारा