सातारा, 15 ऑक्टोबर : दैनिक लोकमतच्या कार्यक्रमामध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली होती. नानांच्या प्रश्नांमुळे ही मुलाखत चांगलीच व्हायरल झाली. आता नाना पाटेकर यांनी या मंडळींना म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना वेळ दिला पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यातील कराड येथील महाविद्यालयात सुरू असलेल्या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला नाना पाटेकर यांनी हजेरी लावली होती. या वेळी झालेल्या प्रश्न उत्तराच्या संवादावेळी एका विद्यार्थांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जात धर्म या विषयावर नाना पाटेकर यांनी रोखठोक भूमिका मांडली.
कोणी तुम्हाला जाती धर्मामध्ये अडकवत असेल तर ते समाजातील सर्वात मोठे गुंड - नाना पाटेकर pic.twitter.com/VxIJYXy8Hr
— News18Lokmat (@News18lokmat) October 15, 2022
आपण आपलं काम करत राहायचं, आपल्या जनमानसाच्या मनात जी प्रश्न येताय आपण विचारत असतो. या वर सरकारला अंमलबजावणी करायची असते. आता गंमत अशी आहे की ही मंडळी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) तीन महिन्यांपूर्वी आली आहे. त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. सरत शेवटी त्यांना अवधी देण्याशिवाय आपल्याकडे काय आहे. तेवढं आपण करूया, हे किती छान काम करता, हे पाहूया. आपल्या मनात जी काही खदखद येईल ती सांगूया, असं म्हणत नाना पाटेकर यांनी शिंदे सरकारची पाठराखण केली. (‘एकनाथराव नुसती मान हलवताय, बोला…’, नाना पाटेकरांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, VIDEO) ‘मी कधीही जात आणि धर्म पाळत नाही. शब्द पाळा, पण जात आणि धर्म हे पलीकडे आहे, ते तुमच्या घरात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवशी तुम्हाला हे फार सोपं जाईल. मी तुझ्यापेक्षा मोठा तू लहान ही गोष्ट तुमच्या मनातून जोपर्यंत जात नाही. तोपर्यंत तुम्ही खरंच पुढे जाणार नाही. ड्रेटमिलवर धावण्यासारखं आहे, जितके तुम्ही पळत जाणार पण एकाच ठिकाणी तुम्ही उभा आहात. हे विसरू नका, असा सल्लाही पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. (नाना पाटेकरांनी दाबला होता फडणवीसांचा आवाज, स्वत:च सांगितला तो किस्सा, पाहा Video) ‘कुणीही तुम्हाला जाती पाती आण धर्मामध्ये अडकवत असेल तर ते सगळ्यात मोठे समाजामध्ये गुंड आहे. प्रत्येक समाजाने आपला धर्म पुढे जाण्यासाठी काम केलं आहे. त्यामुळे प्रत्येकाचे आभार, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे, असंही नाना पाटेकर म्हणाले.