सातारा, 05 ऑक्टोंबर : यंदाच्या नवरात्रीत राज्यात शिथीलता देण्यात आल्याने अघोरी कृत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल(दि.04) रात्री सातारा शहरात दोन गटात वाहन मागे घेण्यावरून दांडियावेळी वादावादी झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्याचे पर्यवसन थेट फायरिंगमध्ये झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. फायर करणारे पसार झाले असून, पोलिस शोध घेत आहेत. सातारा शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान झालेल्या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका शाळेजवळ काल (दि.05) मंगळवारी रात्री दांडिया खेळताना युवकांच्या दोन गटात वादावादी झाली. यामुळे महिला, युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन तणाव वाढला. या घटनेनंतर दोन्ही गट पांगले. मात्र या घटनेतून मध्यरात्री पुन्हा थरकाप उडाला. काही संशयितांनी ढोणे कॉलनीत हवेत फायरिंग केले. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र यामुळे परिसर हादरून गेला.
हे ही वाचा : मुंबईत सी लिंकवर भीषण अपघाताचा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO
शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना जिवंत राऊंड व पुंगळया सापडल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती. संशयित सातारा शहर परिसरातील असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
साताऱ्यात लव्हरला दिला चोप
साताऱ्यात प्रियसीला भेटण्यासाठी तरुणान अक्कल चालवत जुगाड केले. हे जुगाड करण त्याला चांगलच महागात पडल आहे. मुलं पळवणारी व्यक्ती समजून या प्रियकराची लोकांनी धुलाई केली आहे. काल (दि. ३०) सकाळच्या दरम्यान तामजाईनगर परिसरात ही घटना घडली. पोरं पळवून नेणारी टोळीतील माणूस असल्याच्या संशय मनात धरत स्थानिकांनी ताब्यात चांगलाच चोप दिला. ही बाब सातारा शहरातील शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर संशयीतास त्यांनी ताब्यात घेतले. चौकशीत गडी लव्हरला भेटायला बुरख्याच्या वेशात गेल्याचे समोर आले.
हे ही वाचा : 500 रूपये कमी मिळाल्यानंतर पडली ठिणगी, आता तस्मिया देते हजारोंना नोकरी! Video
सातारा शहरातील तामजाईनगर परिसर हा वर्दळीचा आहे. या परिसरात शाळा असल्याने लहान मोठी मुले शाळेत जात होती. याचदरम्यान एक बुरखाधारी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत होता. बुरखा घातलेली महिला ती पुरुषासारखी चालत असल्याचे काही महिलांनी लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला घेरण्यात आले. दरम्यान हा व्यक्ती एका इमारत परिसरात बराचवेळ रेंगाळत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांच्या मनात पाल चुकचुकली. पोरांची शाळा परिसरात असल्याने अखेर काही नागरिकांनी बुरखाधारी व्यक्तीला थेट जवळ जात धरले. तोपर्यंत याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली.