सचिन साळुंके, सातारा, 26 जुलै: गेल्या काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांची दहशत पहायला मिळत आहे. धोकादायक प्राणी बिनधास्तपणे वावरत असून अनेक घरात शिरून हल्ला करत आहेत. आत्तापर्यंत अनेक ठिकाणी हे भयनाक प्राणी घुसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचे अनेक फोटो, व्हिडीओदेखील समोर आले आहेत. मात्र दिवसेंदिवस अशा घटनांध्ये वाढ होत आहे. साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्यांची दहशत पहायला मिळाली. एक दोन नव्हे तर तीन बिबे गावात फिरताना दिसले. त्यांचं हे भितीदायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. कराड तालुक्यातील वराडे येथे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन बिबटे सीसीटीव्ही कॅमेरात फिरताना कैद झालेत. यामुळे वराडे गावात सध्या बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालं असून घराबाहेर कसं पडायचं या चिंतेत ग्रामस्थ आहेत. वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय वराडे येथे आहे, मात्र कोणत्याही हालचाली वनविभागाने केल्या नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे. बिबट्यानं कुत्र्याला घाबरुन ठोकली धूम, घटना CCTV मध्ये कैद दरम्यान, बिबट्या गावात फिरतानाचा व्हिडीओ समोर आल्यापासून एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. आता वन विभाग यावर काय अॅक्शन घेईल याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. जेणेकरुन त्यांना प्राण्यांच्या दहशतीखाली रहावं लागणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.