लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 26 जुलै: आजकाल जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्राणी बेधडकपणे येऊन घरात शिरत असून पाळीव प्राण्यांवर, लोकांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांची दहशत नागरिकांच्या मनात निर्माण झालीय. अनेक ठिकाणी बिबट्या, वाघ, चित्ता मानवी वस्तीत घुसून हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. बिबट्या हळूच बंगल्यात शिरला आणि थेट आत गेला. शेवटी कुत्र्याने बिबट्याला तेथून धूम ठोकण्यास भाग पाडले. नाशिकच्या आडगाव परिसरातून ही घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील समोर आला आहे.
आडगावच्या पाझर तलाव भागातील प्रभाकर माळोदे यांच्या बंगल्यात शिरलेल्या बिबट्यानं बंगल्याच्या दारात बांधलेल्या एका कुत्र्यावर हल्ला केला. याचं वेळी बाजूला असलेल्या दुसऱ्या कुत्र्याने बिबट्यावर हल्ला चढवल्याने बिबट्यानं घाबरून धूम ठोकली. त्यामुळे कुत्र्याचा जीव वाचला.
बिबट्यानं कुत्र्याला घाबरुन ठोकली धूम, घटना CCTV मध्ये कैद pic.twitter.com/Sz73783Kto
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2023
दरम्यान परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार असल्यानं नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलीय. यापूर्वीही अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.