• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • दिवाळीसाठी घराला रोषणाई करताना साताऱ्यातील कुटुंबाला शॉक, पतीचा मृत्यू तर पत्नीसह दोन मुलं गंभीर जखमी

दिवाळीसाठी घराला रोषणाई करताना साताऱ्यातील कुटुंबाला शॉक, पतीचा मृत्यू तर पत्नीसह दोन मुलं गंभीर जखमी

दिवाळीसाठी घराला रोषणाई करताना साताऱ्यातील कुटुंबाला शॉक, पतीचा मृत्यू तर पत्नीसह दोन मुलं गंभीर जखमी (प्रातिनिधिक फोटो)

दिवाळीसाठी घराला रोषणाई करताना साताऱ्यातील कुटुंबाला शॉक, पतीचा मृत्यू तर पत्नीसह दोन मुलं गंभीर जखमी (प्रातिनिधिक फोटो)

Electric shock to whole family in satara while Diwali lighting: घराला विद्युत रोषणाई करताना साताऱ्यातील संपूर्ण कुटूंबाला विजेचा धक्का लागला.

 • Share this:
  सातारा, 31 ऑक्टोबर : दिवाळीसाठी आपण सर्वचजण घराची साफसफाई करुन विद्युत रोषणाई (lighting), कंदील (Diwali Kandil) घराबाहेर लावत असतो. अशाच प्रकारे आपल्या घरावर विद्युत रोषणाई करणाऱ्या साताऱ्यातील (Satara) कुटुंबाला विजेचा धक्का (electric shock) लागला आहे. या घटनेत कुटुंब प्रमुख सुनील मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Electric Shock to whole family in Satara) साताऱ्यातील मोरे कॉलनीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. मोरे कॉलनीत राहणारे सुनील पवार हे आपल्या घराला विद्युत रोषणाई करत होते. घरातील इतर सदस्यही त्यांना मदत करत होते. घराच्या दुसऱ्या मजल्याववर रोषणाई करत असताना सुनील मोरे यांचा हात चुकून वीज वितरणच्या मुख्य लाईनला लागला. यामुळे सुनील पवार यांना विजेचा धक्का लागला आणि ते विजेच्या तारेला चिकटले. आपल्या पतींना विजेचा धक्का लागल्याचं पाहून पत्नीने त्यांच्या बचावासाठी ओढण्याचा प्रयत्न केला असता पत्नीलाही विजेचा धक्का बसला आणि त्याही चिकटल्या. त्यानंतर या दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांना वाचवण्यासाठी हात लावला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. वीज पुरवठा बंद करुन संपूर्ण कुटुंबाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने सुनील पवार यांचा उपचार करण्यापूर्वीच मत्यू झाला होता. तर सुनील पवार यांच्या पत्नी आणि दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोलीत फटाक्यामुळे 9 वर्षीय मुलाने गमावला डोळा फटाके फोडताना एका 9 वर्षीय मुलाने आपला डोळा गमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील औंढा तालुक्यात ही घटना घडली आहे. औंढा तालुक्यातील गोजेगाव (Gojegaon Aundha Taluka) येथे 9 वर्षीय मुलगा फटाके फोडत होता. फटाके फोडत असताना तो फटाका फुटला आणि उडून थेट या चिमुकल्याच्या डोळ्याला लागला. पेटता फटाका डोळ्याला लागल्याने 9 वर्षीय साईनाथ घुगे याच्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेनंतर साईनाथ याला उपचारासाठी नांदेडमधील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पेटता फटाका डोळ्याला लागल्याने झालेल्या दुखापतीत साईनाथ याने डोळा गमावला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीत लहान मुलांना मजा-मस्ती करण्याची एक वेगळीच हौस असते. किल्ला बनवणे, फटाके फोडणे, फराळावर ताव मारणे अशा गोष्टीत लहान मुलांचा पूर्ण वेळ जात असतो. मात्र, फटाके फोडताना लहान मुलांनी आणि पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे परिणाम किती भयंकर होतात त्याचं हे उदाहरण आता समोर आलं आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: