जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / साताऱ्यात जिप्सी रायडिंग आणि गाण्यावर ठेका....उदयनराजेंचा नवा VIDEO VIRAL

साताऱ्यात जिप्सी रायडिंग आणि गाण्यावर ठेका....उदयनराजेंचा नवा VIDEO VIRAL

साताऱ्यात जिप्सी रायडिंग आणि गाण्यावर ठेका....उदयनराजेंचा नवा VIDEO VIRAL

जिप्सी गाडी मनासारखी दुरुस्त केली आहे की नाही, हे पाहण्यासाठी उदयनराजे स्वतः गॅरेजमध्ये आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 25 नोव्हेंबर : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलसाठी आणि रोखठोक स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. आपले छंद जोपासताना ते कधीही कोण काय म्हणेल याचा विचारत करत बसत नाहीत. सोशल मीडियावर त्यांचे रायडिंगचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. दुचाकी असो अथवा चारचाकी गाडी…उदयनराजे हे आपल्या नेहमीच्याच शैलीत साताऱ्यात पाहायला मिळतात. सातारकरांना आजही उदयनराजेंच्या याच हटके स्टाईलचा पुन्हा एकदा अनुभव आला आहे. आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी ते स्वतः MIDC येथील मकानदार गॅरेजमध्ये आले होते. जिप्सी गाडी मनासारखी दुरुस्त केली आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते स्वतः गॅरेजमध्ये आले. गाडीमध्ये बसताच डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर गॉगल लावत गाडीच्या सायलेन्सरचा मोठा आवाज करत उदयनराजेंनी गाण्यावर ठेका धरला आणि धूम स्टाईलने गाडी चालवत शहरात फेरफटका मारला.

जाहिरात

लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपचा झेंडा हाती घेतला. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून त्यांना पराभवही पत्करावा लागला. मात्र तरीही सातारकर तरुणांमधील त्यांची क्रेझ आजही कायम असल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे उदयनराजेंचा रायडिंगचा आजचा व्हिडिओही सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात