मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मी क्रॅक झालो आहे', ठाकरे सरकारवर उदयनराजेंची हटके स्टाईलमध्ये टीका; अजित पवारांवरही पलटवार

'मी क्रॅक झालो आहे', ठाकरे सरकारवर उदयनराजेंची हटके स्टाईलमध्ये टीका; अजित पवारांवरही पलटवार

उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) हे कायमच त्यांच्या हटके स्टाईल वक्तव्यांसाठी चर्चेत असतात.

उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) हे कायमच त्यांच्या हटके स्टाईल वक्तव्यांसाठी चर्चेत असतात.

उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) हे कायमच त्यांच्या हटके स्टाईल वक्तव्यांसाठी चर्चेत असतात.

सातारा, 11 मार्च : राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज अशी ओळख असलेले उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) हे कायमच सणसणीत टोला लगावत असतात, मग ते सत्ताधारी असो की विरोधक. सातारा येथील जलमंदिर या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.

उदयनराजे भोसले यांनी काल मराठा आरक्षण (Maratha Reservation) द्या नाहीतर विष प्यायची परवानगी द्या असं पत्रक जाहीर केलं आणि त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती, पण आज पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी विष प्यायची परवानगी मागितली नाही तर विष प्यायची वेळ त्यांनी म्हणजे सरकारने तयार केली असा सणसणीत टोला राज्य सरकारवर लगावला आहे.

हेही वाचा - लॉकडाउन लावण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान, म्हणाले....

'मी मराठा कुटुंबात जन्मलो म्हणून नाही तर मराठा समाजातील प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. हे आरक्षण मिळणार नसेल तर मग नैराश्य येणार नाही का? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणासाठी आजपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या तरी देखील राज्य सरकार श्‍वेतपत्रिका आणत नाही. त्यामुळे लोकांना कळू द्या तुम्ही नेमके काय दिवे लावले, अशी आक्रमक टीका उदयनराजे भोसले यांनी आज केली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात अनेकांना आजपर्यंत भेटलो, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असं सांगत जनाची नाही तर मनाची तरी थोडी राखा असा सल्लाही उदयनराजे भोसले यांनी दिला.

अजित पवार यांना प्रत्युत्तर

दुसरीकडे, काल पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांना उदयनराजेंच्या विष प्यायच्या परवानगीबाबत विचारल्यावर अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत आवाज उठवावा असं वक्तव्य केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना उदयनराजे भोसले यांनी अजित दादा यांना तुम्ही नेमकं काय केलं हे दाखवून द्या तुम्ही स्वतःला तज्ञ समजता,तर श्‍वेतपत्रिका आणा असाही टोलाही उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांना लगावला.

'आरक्षणाबाबत यापुढे लोकांचा उद्रेक होईल. त्यामुळे लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. पण हे आरक्षण देणार नसतील तर यांना मूकबधीर शाळेत टाका. आता मी विष पिणार नाही पाजणार आहे,' असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. तर राज्य सरकार बद्दल तुमचे मत काय आहे म्हटल्यावर मी आता क्रॅक झालो आहे. सगळेच तज्ञ आहेत... गाडा पुढे ढकलायचं काम सुरू आहे आणि पैशाचा विषय असेल तर पाच दिवस काय पाच वर्ष राज्य सरकार टिकेल, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

First published:

Tags: Udayan raje bhosle