मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ट्रेनिंगसाठी गेलेल्या साताऱ्यातल्या बसचा मनालीमध्ये भीषण, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक

ट्रेनिंगसाठी गेलेल्या साताऱ्यातल्या बसचा मनालीमध्ये भीषण, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक

एक मोठी बातमी समोर येतेय. मनाली (Manali)  येथे प्रशिक्षणासाठी (Training) गेलेल्या साताऱ्यातील बसचा अपघात झाला आहे.

एक मोठी बातमी समोर येतेय. मनाली (Manali) येथे प्रशिक्षणासाठी (Training) गेलेल्या साताऱ्यातील बसचा अपघात झाला आहे.

एक मोठी बातमी समोर येतेय. मनाली (Manali) येथे प्रशिक्षणासाठी (Training) गेलेल्या साताऱ्यातील बसचा अपघात झाला आहे.

सातारा, 06 जून: एक मोठी बातमी समोर येतेय. मनाली (Manali) येथे प्रशिक्षणासाठी (Training) गेलेल्या साताऱ्यातील बसचा अपघात झाला आहे. प्रशिक्षण संपून माघारी येत असताना मंडी परिसरात हा अपघात झाला आहे. एकूण 50 जण प्रशिक्षणासाठी गेले होते,अशी माहिती समोर आली आहे.

साताऱ्यातून रेस्क्यू ऑपरेशनच्या ट्रेनिंगसाठी हिमाचल प्रदेश मध्ये गेलेल्या बसला मनाली येथील मंडी परिसरात अपघात झाला आहे... सातारा जिल्हा परिषद यांच्या मार्फत अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट यांच्या ट्रेनिंग साठी साताऱ्यातून शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स मधून 50 जण या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले होते.

चार आठवड्यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर माघारी येत असताना दुसऱ्या ट्रॅव्हल्सने साताऱ्यातील ट्रॅव्हल्सला समोरून धडक दिल्याने चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे तर इतर पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.अपघातात जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तर सर्व ट्रेकर्स टीममधील सदस्य सातार्‍याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

वजन कमी करण्यासाठी घेतलेली सगळी मेहनत विकेंडच्या या चुकांमुळे पाण्यात जाते, हे उपाय करा

उत्तरकाशीत बस दरीत कोसळून 25 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील (Uttarkashi in Uttarakhand) उत्तरकाशी येथे झालेल्या बस अपघातानंतर मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) शोककळा पसरली आहे. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश प्रवासी हे पवई विधानसभा गाव-मोहंद्रा आणि चिकलहाई येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (State Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आणि रात्री उत्तराखंडला रवाना झाले. मंत्री ब्रजेंद्र प्रताप सिंह (Minister Brajendra Pratap Singh) आणि चार वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत उत्तराखंडला गेले आहेत. रात्री डेहराडूनमध्ये संपूर्ण बचाव आणि जखमींच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासोबतच मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सकाळी उत्तरकाशी जिल्ह्याला रवाना होतील. दुसरीकडे, पन्ना आणि उत्तरकाशी प्रशासनाने लोकांना मदत करण्यासाठी 07732181, 01374- 222722, 222126, 1077, 07500337269 हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

पीएम मोदींनी अपघातावर व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली.

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले, उत्तराखंडमधील बस दुर्घटना अत्यंत वेदनादायक आहे. यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे. यात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये 30 हून अधिक लोक होते आणि ते यमुनोत्रीला दर्शनासाठी जात होते.

''माझे हात सोडा...'', चोर समजून 17 वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण; ठाण्यातला धक्कादायक प्रकार

दुसर्‍या ट्विटमध्ये पीएमओने म्हटले आहे की, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातील. 28 ते 29 लोक होते. बोर्डवर चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्य सचिव सुखबीर सिंग संधू यांनी सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रवासी यमुनोत्री येथून दर्शन घेऊन परतत होते. हिमाचल-उत्तराखंडच्या सीमेजवळ असलेल्या दमता येथे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

First published:

Tags: Private bus, Satara (City/Town/Village)