• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'ठुमक्या'मधून वेळ मिळाला तर बीडकडे बघा, विनायक मेटेंचा धनंजय मुंडेंना टोला

'ठुमक्या'मधून वेळ मिळाला तर बीडकडे बघा, विनायक मेटेंचा धनंजय मुंडेंना टोला

'अहमदनगरमध्ये होरपळून अकरा लोकांचा मृत्यू झाला तेही सरकारी दवाखान्यात झाला त्याचे एवढे मोठे दुखाचे सावट असताना..'

'अहमदनगरमध्ये होरपळून अकरा लोकांचा मृत्यू झाला तेही सरकारी दवाखान्यात झाला त्याचे एवढे मोठे दुखाचे सावट असताना..'

'अहमदनगरमध्ये होरपळून अकरा लोकांचा मृत्यू झाला तेही सरकारी दवाखान्यात झाला त्याचे एवढे मोठे दुखाचे सावट असताना..'

  • Share this:
बीड, 07 नोव्हेंबर : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांना सपना चौधरीच्या (sapna chaudhary) ठुमक्यानंतर वेळ मिळला तर बीड (beed) जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यास अतिवृष्टीग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न सोडवावे, असा खोचक टोला आमदार विनायक मेटे (vinyak mete) यांनी लगावला आहे. परळी शहरात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मतदार संघातील लोकासाठी स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते शहरातील हलगे गार्डन वरील कार्यक्रमात हरियाणा डान्सर सपना चौधरी च्या नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामुळे मुंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. बीडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. 7 वर्षांच्या मुलानं सुरु केली बँक, झाले 2000 सदस्य; काम बघून वाटेल अभिमान अहमदनगरमध्ये होरपळून अकरा लोकांचा मृत्यू झाला तेही सरकारी दवाखान्यात झाला त्याचे एवढे मोठे दुखाचे सावट असताना, शेतकऱ्याला आजही पैसे मिळाले नाहीत त्यांची दिवाळी काळी साजरी होत असताना, एसटी कामगार उपाशीपोटी न्याय हक्कासाठी धरणे धरून बसले ते दिवाळी साजरी करत नाहीत हे प्रश्न सोडून सामजिक न्यायमंत्री सपना चौधरीचे ठुमके पाहतात हे दुर्दैव आहे. थोडं तरी समाजभान बाळगा, असं आमदार विनायक मेटे म्हणाले. तसंच, . 'विरोधी पक्ष नेते असताना धनंजय मुंडेंना सामजिक भान होत आता सामजिक न्याय मंत्री असताना सामजिक भान राहिले नाही, असा आरोप मेटेंनी केला. धनंजय मुंडेच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमामुळे तीव्र संताप दरम्यान, प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीने पुन्हा एकदा परळीमध्ये ठुमके लगावले. निमित्त होतं धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन आणि फराळ कार्यक्रमाचं. एकीकडे आजही अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत पोहोचलेली नाही, शेतकरी आत्महत्या करत आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचारी आपली दिवाळी आगारातच साजरी करत आहे. या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम कितपत योग्य आहे ? असा प्रश्न उपस्थित होतोय. VIDEO: OMG! बिबट्याला जवळ येताना पाहताच कुत्र्याला आला हार्ट अटॅक; तडफडून मृत्यू यापूर्वी 2018 मध्ये नाथ फेस्टिव्हलमध्ये सपना चौधरीच्या "तेरी आंखो का ये काजल" गाण्यानंतर धनंजय मुंडेंवर टीका झाली होती. सध्या कोरोनाचं सावट कायम असताना सर्वसामान्यांना सरकारकडून निर्बंध पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र या परिस्थितीत त्यांचेच मंत्री असं वागत असल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.
Published by:sachin Salve
First published: