संजय राऊतांचे काँग्रेससोबत उडाले खटके, म्हणाले - अंदमानच्या तुरुंगात पाठवा तरच....

संजय राऊतांचे काँग्रेससोबत उडाले खटके, म्हणाले - अंदमानच्या तुरुंगात पाठवा तरच....

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी कॉंग्रेसवर पुन्हा निशाणा साधला आहे. विनायक दामोदर सावरकर यांना विरोध करणाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले आहे. ते म्हणाले, विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे विरोध करीत आहेत त्यांनी दोन दिवस अंदमान येथील तुरुंगात जाऊन राहावे. तेव्हाच त्यांना सावरकरांच्या बलिदानाची, त्यागाची जाणीव होईल. सध्या वीर सावरकरांच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांमध्ये मोठे वादळ उठले आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिला तर आम्ही विरोध करू, असं चव्हाण यावेळी म्हणाले होते.

वीर सावरकरांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून कॉंग्रेसवर निशाणा साधला होता.

काय म्हणाले होते संजय राऊत...

महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभागबद्दलही अनेकही शंका उपस्थित केल्या जातात. पण सावरकर व त्यांच्यासारख्या असंख्य सशत्र क्रांतिकारकांच्या वाट्याला ज्या यातना, छळ अंदमानच्या तुरुंगात आला तशा यातना गांधी, नेहरू, बोस, सरदार पटेल यांच्या वाट्याला आल्या नाहीत. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून स्वत:ची सुटका करून घेतली, असे बोलले जाते परंतु ते अर्धसत्य. मात्र त्यांनी माफी मागितलीही असेल, यात काय चूक केली. ब्रिटिश राजवटीत कोणी प्रसंगानुसार देशभक्त बनला तर कोणी अपघाताने. परंतु सावरकरांचे क्रांतिकार्य अमर आहे. 14 वर्षे अंदमानात त्यांनी यातना भोगल्या. अटी शर्तींवर त्यांनी अंदमानातून सुटका करून घेतली. सावरकरांनी बाहेर यावे, ही सगळ्यांचीच इच्छा होती. सावरकरांनी ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा ठोठावली असती तर सावरकर हसत हसत फासावर गेले असते. सावरकरांनी मृत्यूला अनेकद चकवले. त्यांनी अंदमानानंतरचे रत्नागिरीतले आयुष्यही राष्ट्रीय कामासाठीच अर्पण केले, अशा शब्दात वीर सावरकरांवर सवाल उठवणाऱ्यांना शिवसेनेने तासले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 02:36 PM IST

ताज्या बातम्या