मुंबई, 10 नोव्हेंबर : तब्बल 103 दिवसानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी जल्लोषात सगळ्यांचे आभार मानले. याचबरोबर न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर आक्षेप घेत ईडीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान ईडीने या जामीना विरोधात आपला आक्रमक पावित्रा घेतला आहे. ईडी आता संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. बुधवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यानंतर संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली. परंतु ईडी याविरोधात जात मुंबई हायकोर्टात याचीका दाखल केली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जामीनाला ईडीचा विरोध आहे.
हे ही वाचा : तुरुंगातील शंभर दिवसांवर पुस्तक तयार, राऊत म्हणतात तुरुंगातील एक दिवस….
दरम्यान यावर जामीन रद्द करण्यासाठी ईडीच्या याचिकेवर,आज होणार सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टासमोर या याचिकेवर काही वेळात होणार सुनावणी होणार आहे. यामुळे हायकोर्टात काह निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संजय राऊत यांना पुन्हा अटक होणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला.
हे ही वाचा : ‘सूर बदले बदले है जनाब के, कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलला’; मनसेचा राऊतांना टोला
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.