मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli : सोयाबीनचे दर कधी वाढणार? पाहा काय म्हणतात व्यापारी Video

Sangli : सोयाबीनचे दर कधी वाढणार? पाहा काय म्हणतात व्यापारी Video

X
when

when will the price of soybeans increase

सोयाबीनच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Sangli, India

  सांगली, 31 जानेवारी : सोयाबीनच्या भावात आठवडाभरात मोठी घसरण झाली आहे. सध्या सोयाबीन 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात आहे. शेतकऱ्यांना भाव वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, सोयाबीनच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळेच बाजाराचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

  सोयाबीन हे शेतकऱ्यांचं हक्काचं नगदी पिक आहे. खरिपातील पिकांमध्ये शेतकऱ्यांना उडीद, मुगानंतर हमखास पैसे देणारं दुसरं नगदी पिक म्हणजे सोयाबीन. मात्र सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयाबीनला 4 हजार 600 रुपयांचा दर मिळाला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या लागवडीचा खर्च वाढला आहे. मात्र, सोयाबीनचे भाव पडल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

  7500 भावाची अपेक्षा

  शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगले दर मिळत नसल्याने शेतकरी विक्री न करता घरातच सोयाबीन साठवून ठेवत आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार साडेसहा ते साडेसात हजार इतका दर सोयाबीनला अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी हा भाव शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागेल, अशी ही माहिती व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

  सोयाबीनचे मोठे नुकसान

  सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक रोगांचा सामना करावा लागतो यामध्ये यलो मोझॅक वायरस म्हणजेच पिवळा वायरस. या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले होते. शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळवून द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

  इंजिनिअरिंग सोडून सुरू केली Dairy, आता पगारापेक्षा अधिकची कमाई Video

  सध्या भावच नाही

  सरकारने पिकांच्या कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालांच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे, व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देण्याचे काम केले जाते. परंतु शेती मालाला भाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

  First published:

  Tags: Farmer, Local18, Sangli