जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संतापजनक! NEET परीक्षेत मुलींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी; कपडेही उलटे घालण्यास भाग पाडले

संतापजनक! NEET परीक्षेत मुलींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी; कपडेही उलटे घालण्यास भाग पाडले

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

NEET 2023 च्या परीक्षेच्या वेळी सांगलीत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

सांगली, 10 मे : नीट परीक्षेदरम्यान सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही विद्यार्थिनींना ड्रेस बदलण्यास सांगण्यात आले. एवढेच नाही तर काही विद्यार्थिनींच्या ब्रा काढण्यात आल्या, तर काहींना इनरवेअर उलटे घालण्यास सांगण्यात आले. याप्रकरणी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी एनटीएकडे तक्रार केली आहे. हा धक्कादायक प्रकार सांगलीसह चंदीगढ आणि पश्चिम बंगालमध्येही घडल्याचे उघड झाले आहे. सांगलीत नीट परीक्षेत घडलेल्या प्रकरणा बाबत (शिंदे गट) शिवसेनेच्या युवासेनेकडून करावाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहेत. काय आहे प्रकार? रविवारी 7 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात ही परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांना अंगावरील कपडे उलटे करुन घालण्यास भाग पाडण्यात आले. एवढेच नाही तर चक्क अंतरवस्त्रेही उलटी करुन घालायला लावण्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, परीक्षा संपल्यानंतर आपल्या पाल्यांनी उलटी कपडे घातल्याचे पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना याबाबात विचारले असता घडलेला प्रकार विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितला. यानंतर पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला. या प्रकाराबाबत संतप्त पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे घडलेला प्रकार संतापजनक आणि तळपायाची आग मस्तकात नेणारा असल्याने संबंधित परीक्षा केंद्रासह केंद्र अधिकारी, सुपरवायझर या सर्वांवर ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युना सेनेने केली आहे. येत्या चार दिवसात घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अन्यथा युवासेना विद्यार्थी आणि पालकांसह रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही युवा सेनेने दिला आहे. वाचा - श्रद्धा वालकरला न्याय मिळणार? आफताब पुनावाला केसमधली सर्वात मोठी अपडेट   एनटीएने मागवले सीसीटीव्ही फुटेज असाच प्रकार पश्चिम बंगालमध्येही समोर आला आहे. यासदंर्भात एनटीएच्या अधिकाऱ्याने पश्चिम बंगालच्या घटनेप्रकरणी विद्यार्थ्यांना खुल्या खेळाच्या मैदानात कपडे बदलण्यास सांगितले गेले, असे सांगितले. सांगलीतील केंद्राबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, ‘काही निरिक्षकांना कुर्ते घातलेल्या मुलींवर काहीतरी लिहिलेले आढळले. म्हणून, कदाचित सुरुवातीला काही लोकांना त्यांचे टॉप आतून बाहेर घालण्यास सांगितले गेले होते, परंतु ते थांबवण्यात आले. आम्ही तपास यंत्रणेकडून निवेदन मागवले असून सीसीटीव्ही फुटेज मागवले आहेत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam , sangli
  • First Published :
जाहिरात
जाहिरात