मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गरिबांची दुकानं पाडणं पडलं भारी, गोपीचंद पडळकरांच्या भावाला कोर्टाचा मोठा दणका

गरिबांची दुकानं पाडणं पडलं भारी, गोपीचंद पडळकरांच्या भावाला कोर्टाचा मोठा दणका

मिरज शहरात जेसीबीच्या सहाय्याने दुकाने आणि हॉटेलचं बांधकाम पाडण्यात आलं होतं. बेकायदेशीररित्या जमाव जमवून मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

सांगली, 25 जानेवारी : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात दुकाने आणि हॉटेलचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले होते. या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंजद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांना आणखी एक दणका बसला आहे. मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्या जागेबाबत निकाल दिला आहे. यात मिळतकदारांचा त्या जागेवर कब्जा न्याय दंडाधिकाऱ्यांनी मान्य केला आहे.

गेल्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या मिरजेतील वादग्रस्त जागेच्या बाबत आज तहसीलदारांनी आपला निकाल दिला आहे. या निकालामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांना तहसीलदारांच्या निकालाने दणका बसला आहे. मिरजेतील त्या वादग्रस्त जागेबाबत तहसीलदार दगडू कुंभार यांच्या दालनामध्ये आज हा निकाल देण्यात आला.  यामध्ये सदर पडकाम झालेली जागा ही मिळकतदारांच्याच कब्जात असल्याचे कागदपत्रे तपासल्यानंतर समोर आल्यामुळे तहसीलदार दगडू कुंभार यांनी मिळकतदारांच्या बाजूने आपला निकाल दिला आहे .

हेही वाचा : Bageshwar Maharaj : बागेश्वर महाराजांना नागपूर पोलिसांकडून क्लिन चिट, अंनिसला मोठा धक्का

पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभा देण्यात आलेली आहे . त्यामुळे या वादग्रस्त जागे बाबत गेल्या अनेक दिवसापासून सुरू असणारी चर्चा आता थांबली आहे. यामुळे आता पडळकर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मिळकतदारांच्या मिळकती पाडण्याचा प्रयत्न केला व कब्जा करण्याचा प्रयत्न केला याबाबत मिळकतदार पुढील लढाई लढणार आहेत. तसेच आपल्या झालेल्या नुकसानीची भरपाई ते मागणार आहेत.

आता मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सुनावणी करताना ब्रह्मानंद पडळकर यांना दणका दिला आहे. संबंधित जागेवर मिळकतदारांचा कब्जा असून आता पडळकर यांनी योग्य त्या ठिकाणी दाद मागावी असंही न्यायालयाने म्हटलंय. मिरजेत रस्त्या शेजारी असलेली दोन हॉटेल्स, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर आणि पान शॉप पाडण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांनी तक्रार दाखल केली होती.

First published:

Tags: Sangli, मिरज