सांगली, 07 जानेवारी : मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. नात्यातील गोडवा वाढणाऱ्या या सणानिमित्त आपल्या जवळच्या लोकांना तिळगूळ देऊन तोंड गोड करण्याची प्रथा आहे. मात्र, आता अलीकडे तिळगुळाची जागा वेगवेगळ्या मिठाईने घेतली आहे. त्यात गुळाची चिक्की ही प्रसिद्ध मिठाई आहे. यामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचा वापर केला जातो. आरोग्यासाठी देखील चिक्की लाभदायी असते. मात्र, ही चिक्की नक्की बनते कशी, पाहुयात. थंडीचे दिवस आले की, सर्वांत सहज मिळणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे गुळाची व राजगिऱ्याची चिक्की. सांगली शहरात अशी चिक्की बनवणारे अनेक व्यावसायिक असून, काही जण छोट्या प्रमाणात आपल्या घरीसुद्धा हा उद्योग करतात. या चिक्कीबरोबरच त्यांचे लाडूसुद्धा तितकेच प्रसिद्ध असतात. राज्याच्या कोणत्याही गावात गेलो की, ही चिक्की सहज मिळते. शहरात राहणाऱ्या चव्हाण बंधू यांची चिक्की सर्वत्र फेमस आहे. गेल्या 150 वर्षांपासून त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आजही सुरु आहे. विशेष म्हणजे त्यांची चिक्की महाराष्ट्रातच नव्हे तर प्रदेशातही आवडीने खाल्ली जाते. ड्रायफ्रूट चिक्की महाराष्ट्रात तर लहानग्यांबरोबरच मोठ्यांचासुद्धा आवडता पदार्थ म्हणजे चिक्कीच. चिक्की म्हटलं कि, सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ती लोणावळ्याची चिक्की. मात्र, महाराष्ट्रातील इतरही शहरात आपुलकीने तयार केली जाणारी चिक्की देखील फेमस आहे. सांगलीतील गावभाग परिसरात असणाऱ्या चव्हाण यांच्या चिक्कीने आपला स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. ड्रायफ्रूटसह असलेल्या विविध प्रकारच्या चिक्कीने देशाच्या सीमारेषा ओलांडत परदेशातही प्रवेश केला आहे.
यामागे चव्हाण कुटुंबीयांचे मोठे कष्टही आहेच. चव्हाण यांच्या आजोबांनी सुरुवातीला चिक्की व लाडू हा व्यवसाय सुरू केला. पण पुढे त्याची मागणी वाढली. त्यानंतर त्यांनी आपल्या घरीच कुटुंबीयांच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला. रोज हात गाड्यावरून मोठी थैली घेत शहरभर फिरत विक्री करून त्यांनी आपले जाळे निर्माण केले. DRDO चा भन्नाट प्रयोग, लष्करासाठी बनवलं वर्षभर ताजं राहणारं अन्न, Video संक्रांतीनिमित्त मोठी मागणी आज सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत त्यांच्या चिक्कीला चांगली मागणी आहे. शेंगदाणा, राजगिरा, तिळाची चिक्की, राजगिरा लाडू बनवून त्यांनी अनेकांना रोजगारही दिला आहे. सांगलीच्या चिक्कीला आता संक्रांतीचे वेध लागले आहेत. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर शेंगदाणा चिक्की, राजगिराच्या लाडवांबरोबरच आपल्याला तिळाची चिक्की व लाडूची चव चाखायला मिळणार आहे.

)







