सांगली, 08 नोव्हेंबर : आपल्या विधानांमुळे काय वादात सापडणारे संभाजी भिडे गुरुजी यांची इन्फोसेसच्या माजी अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी भेट घेतली. यावेळी सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडे यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. सांगलीमधील एका कार्यक्रमात ही भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्फोसेसच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची आज सांगलीमध्ये भेट झाली. या दरम्यान शिवप्रतिष्ठानकडून रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सुवर्ण सिंहासना बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी वेळ मागितली आहे.
शिवप्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सुवर्ण सिंहासन आणि त्याच्याशी संबंधित इतर सविस्तर माहिती देण्यासाठी वेळ मागितली. यावेळी सुधा मूर्तींनी आपला दौरा खूप व्यस्त असल्याचे सांगत ऑनलाइन द्वारे माहिती घेऊ,असं गुरुजींना सांगितलं. (छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल? आव्हाड का असं म्हणाले?) मात्र गुरुजींनी त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीची विनंती केल्यानंतर सुधा मूर्तींनी संभाजी भिडे गुरुजी यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये भेट घेण्याचं आश्वासन देत बंगळुरूला येण्याचं निमंत्रण दिलं आहे.