सांगली, 30 डिसेंबर : मांडूळ या दुर्मीळ जातीच्या सापाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. हा साप सहजासहजी मिळत नाही. तंत्र विद्या आणि औषधांसाठी या प्रजातीच्या सापाचा वापर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात याला कोट्यवधींची बोली लागते. सांगली त हा साप आढळला असून वनविभागाने ताब्यात घेतला आहे. मांडूळ जातीचा साप साप सहजासहजी मिळत नाही. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंगांचा हा साप असतो. या सापाचा शोध घेण्यासाठी तस्कर जंगलात फिरत असतात. मात्र, बामणोली येथील कवलापूर रस्त्यालगत असणाऱ्या कोंडके मळा परिसरातील अक्षय पाटील यांच्या घराबाहेर हा साप आढळून आला. घरमालकाने तत्काळ सर्प मित्राला बोलावले. सर्प मित्राने त्या ठिकाणी येऊन पाहणी केली असता तो दुर्मीळ मांडुळ जातीचा साप असल्याचे निदर्शनास आले. सर्प मित्रांनी त्या दुतोंड्या सापाला सुरक्षित रित्या पकडून बंदिस्त केले. साधारण तीन फुटाहून अधिक लांबीचा मांडुळ जातीचा सापाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. या दुतोंड्या सापाला वनविभागाच्यावतीने सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
अंधश्रद्धा आणि तस्करीचे प्रमाण अधिक मांडूळ हा सर्प दुतोंड्या साप म्हणून ओळखला जातो. गुप्त धन शोधणे, औषधी गुणधर्म अशा अनेक अंधश्रद्धांना बळी पडलेला या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होऊ होते. त्याचमुळे हा साप दुर्मीळ घोषित करण्यात आला. शांत ,लाजाळू असल्यामुळे या सर्पाबाबत अंधश्रद्धा आणि तस्करीचे प्रमाण जास्त झाले आहे. साखरेपेक्षा चिक्कीचा गूळ खातोय भाव, पाहा काय आहेत दर ? Video मांडूळ साप साधारण ग्रामीण भागामध्येच आढळतो. या सापाला मोठी मागणी देखील असते. असा साप कोठे दिसून आल्यास कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता वनविभाग अथवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

)







