असिफ मुरसल, सांगली, 06 मे : सांगलीच्या जतमधील एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. देवदर्शनाहून परत येत असताना गाडीला भीषण अपघात झाला. विजापूर - गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ अपघात झाला. स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण मयत झाले. गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री घडला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातात चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय 40रा.जत), नामदेव पुनाप्पा सावंत (वय 65), पदमिनी नामदेव सावंत (वय 60), श्लोक आकाशदिप सावंत (वय 8) मयुरी आकाशदिप सावंत (वय 38) यांचा मृत्यू झाला. सध्या हे सर्वजण जत मध्ये राहत होते. हे चौघे जण एकाच कुटुंबातील असुन आजी, आजोबा सून व नातू याचे मयत झाले आहेत. या अपघातात वरद सावंत (वय दहा वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. वृद्धाचा मृतदेह 2 वर्ष डीप फ्रीजमध्ये ठेवून करत राहिला संतापजनक कृत्य, पाहून पोलीसही शॉक अपघातात चालक दत्ता चव्हाण , मयुरी सावंत यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आजी, आजोबा सून व नातू हेसुद्धा मयत झाले आहेत. या अपघातात वरद सावंत हा वय दहा वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास सांगलीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चार जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले आहे . चालक दत्ता हा जखमी होता. त्यास उपचारांसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. पुढील तपास जत पोलीस करत आहेत..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.