सांगली, 07 जानेवारी : सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात रात्रीच्या अंधारात दुकानं आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले आहे. या प्रकरणी अखेर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासहीत 100 जणावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधारात ही कारवाई करण्यात आली आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. अखेर या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासहीत 100 जणावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान केलं. बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, लोकांना मारहाण केली. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. या प्रमाणे 12 कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे. (‘योगींनी नाकासमोर मुंबईतून 5 लाख कोटी उडवून नेले’, सेनेचा शिंदे सरकारवर घणाघात) रस्त्या शेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती पाडण्यात आल्या आहेत. मध्यरात्री जेसीबीच्या साह्यायाने दुकानं आणि घर पाडली आहेत. हजार लोकांच्या साह्यायाने जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आले होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. (Electricity Bill : शिंदे सरकार लवकरच देणार वीज दरवाढीचा शॉक, प्रत्येक युनिटला मोजावे लागणार इतके पैसे!) घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ब्रह्मानंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अखेरीस पोलिसांनी याा प्रकरणी ब्रम्हानंद पडळकरांसह 100 जणांवर गुन्हा दाखल केल आहे. गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.