जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: सेल्फी काढायला गेला अन् नदीत अडकला, मग झालं असं की....

VIDEO: सेल्फी काढायला गेला अन् नदीत अडकला, मग झालं असं की....

VIDEO: सेल्फी काढायला गेला अन् नदीत अडकला, मग झालं असं की....

Sangli youth stuck in river while clicking selfie: सेल्फी काढण्यासाठी नदी पात्रतात गेलेल्या तरुणाची चांगलीच फजिती झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 24 जुलै : कोकणासोबतच पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस (Heavy rainfall) कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर (River overflow) आला असून पाणी नदी पात्राच्या बाहेरील वस्त्यांमध्ये आले आहे. सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नदीतील पुलासाठी बांधण्यात आलेल्या पिलरवर जावून सेल्फी (Selfie) काढणं एका तरुणाच्या अंगलट आलं. सांगलीतील प्रसिद्ध असलेल्या आयुर्विन पुलावर (Irwin Bridge) चढून सेल्फी काढायला गेलेलं तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे. बोटीतून उतरून वाहत्या पाण्यात पुलाच्या टोकाला जाऊन सेल्फी काढत होता. अखेर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने खाली येता येईना. त्यानंतर कसेबसे त्याला बोटी मध्ये घेऊन नदी काठी आणण्यात आले. त्यामुळे तुम्ही सुद्धा असे नको ते थाडस करायला जाऊ नका, आपली काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO

जाहिरात

सांगलीत मुसळधार पाऊस सांगली आणि मिरजेतील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकाने सांगलीवाडी आणि कृष्णा घाट मिरज येथे प्रत्येकी 2 बोट, रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या टीमकडून नागरिकांसाठी मदतकार्य आणि बचाव कार्य केले जाणार आहे. यासाठी सांगली आणि मिरजेत अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान, आपत्ती मित्र कार्यरत आहेत. कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली शहरात 50 फूटापर्यंत पोहचल्यानंतर ज्या नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी जात आहे. नागरिकांना बाहेर पडणेची अडचण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने तातडीने  सांगली शहर आणि सांगलीवाडीमध्ये 2 आणि मिरज कृष्णा घाट परिसरात 2 अशा रेस्क्यू टीम बोटीसहित तैनात केल्या आहेत. या रेस्क्यू टीमसाठी अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे प्रमुख असून ज्या भागात पाणी आले आहे. नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद पडली आहे अशा ठिकाणी ही टीम जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणार आहे. रेस्क्यू टीममुळे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना मोठी मदत होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात