• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • SANGALI UPDATE : पडळकरांच्या गाडीसह 3 गाड्यांचा तोडफोड, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गंभीर जखमी

SANGALI UPDATE : पडळकरांच्या गाडीसह 3 गाड्यांचा तोडफोड, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गंभीर जखमी

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांची तोडफोड केली आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांची तोडफोड केली आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांची तोडफोड केली आहे.

  • Share this:
सांगली, 07 नोव्हेंबर :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (bjp mla gopichand padalkar) गट आणि राष्ट्रवादी-शिवसेना (ncp-shivsena) गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आटपाडी या ठिकाणी राडा झाला आहे. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तरी या घटनेमध्ये राष्ट्रवादीच्या (ncp) एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमधून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणुका सुरू आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवार पळवा-पळवीचा प्रकार आटपाडी याठिकाणी घडला. आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस गट आमने-सामने येऊन राडा झाल्याचा प्रकार घडला आहे. साठे चौक या ठिकाणी घडलेल्या या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यास गंभीर दुखापत झाली आहे. 7 वर्षांच्या मुलानं सुरु केली बँक, झाले 2000 सदस्य; काम बघून वाटेल अभिमान या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर आटपाडीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.तर जखमी राजू जानकर यांनी आमदार पडळकर यांच्यावर शिवीगाळ करत दुखापत केल्याचा आरोप केला आहे. VIDEO: OMG! बिबट्याला जवळ येताना पाहताच कुत्र्याला आला हार्ट अटॅक; तडफडून मृत्यू जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या नातेवाईकास राष्ट्रवादी गटात उमेदवारी मिळाल्याने पडळकर यांनी संतप्त होऊन हा प्रकार केल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे.
Published by:sachin Salve
First published: