ठाण्यातील तलावपाळी येथे आज संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. मनसेकडून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या आवाजातील एक टीझर देखील मनसेकडून जाहीर करण्यात आला आहे. गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्लाबोल केला. खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर राज ठाकरेंनी निशाणा साधला. इतकेच नाही तर हिंदुत्ववादी भूमिका स्पष्टपणे मांडत इतर विषयांवरही भाष्य केलं. राज ठाकरेंच्या या भाषणाची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत झाली आणि विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. याच सर्व प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी आजची सभा आयोजित केली आहे.राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना "लावरे तो व्हिडीओ"ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 12, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.