मुंबई, 16 जुलै : कोकणातील मुख्य दुर्गांपैकी एक मानला जाणार विजयदुर्ग म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुनर्बांधणी करून सुरक्षित केला होता. शेकडो वर्षे हा किल्ला समुद्राच्या लाटांना तोंड देत आहे. परंतु मागच्या काही दिवसांपूर्वी विजयदुर्गच्या तटबंदींना मोठी फुग आल्याचे दिसू आले आहे. दरम्यान याबाबत मागच्या दोन वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने शिवप्रेमी आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी लवकरात लवकर विजयदुर्गाचे काम सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Sambhajiraje Chhatrapati)
संभाजीराजे छत्रपती म्हणाले कि, मराठा आरामाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. 2020 साली विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली होती. तसेच पुरातत्व खात्याकडून संबंधित काम करण्यासाठी अवश्यक असलेल्या सर्व त्या परवानग्या घेतल्या होत्या. लवकरात लवकर विजयदुर्गाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा होती.
हे ही वाचा : दुचाकीस्वाराला वाचवण्याचा नादात दाम्प्त्यासह नदीत कोसळली कार; कोल्हापुरातील घटनेचा VIDEO
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या अनेक वास्तू आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यांचं जतन, संवर्धन करणं गरजेचं आहे. गडाच्या तटबंदीला काही ठिकाणी या वर्षी फुग आल्याचे दिसत असून, लवकर याकडे लक्ष न दिल्यास तटबंदी मोठ्या प्रमाणात ठासळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सरकार व केंद्र सरकार यांनी लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालावे;आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी जतन करावा हि सर्व शिवभक्तांच्या वतीने कळकळीची विनंती असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
हे ही वाचा : ‘4 गाढवं एकत्र चरत असली, तरी हुकूमशहाला भीती वाटते की…’; ‘त्या’ मुद्द्यावरुन शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा
राज्यात गेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये)
कोकण : माथेरान - 350, जव्हार- 220, , कर्जत - 210, शहापूर - 190, विक्रमगड - 170, पेण-160, खालापूर, भिवंडी-130, पालघर, मुरबाड- 130.
मध्य महाराष्ट्र : लोणावळा-210, इगतपुरी-170, महाबळेश्वर - 130, आजरा - 110, पेठ - 110, ओझरखेडा, गगनबाबडा - 100. विदर्भ : सावनेर - 140, उमरेड- 110, दिवापूर-90, गोंदिया- 80, नागपूर - 80.
मराठवाडा : माहुर- 36, विल्लोली- 27, धर्माबाद-24, उमरी - 15.
राज्यातील या भागात येलो अलर्ट :
कोल्हापूर - 16 जुलै, रायगड, रत्नागिरी - 16 ते 19 जुलै, पुणे (घाट), सातारा (घाट)-16 जुलै, परभणी, हिंगोली, नांदेड- 17, 18 जुलै, नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा- 16, 17 जुलै, चंद्रपूर - 16 ते 19 जुलै, गोंदिया - 16, 18 जुलै, वर्धा, वाशिम, यवतमाळ - 16, 17 जुलै.