लातूर, 13 जानेवारी : राज्यात कोरोनाचं (Corona) थैमान सुरु असताना लातूरमधून (Latur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेते आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमित देशमुख यांच्या आशीर्वादाने कोरोना काळात लातूर जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी नेमके काय आरोप केले आहेत? कोविड काळात लातूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आशीर्वादाने मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. पीपीई किट असेल किंवा कोविड रुग्णांना देण्यात येणारा आहार असेल यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. एका पेशंटला तपासण्यासाठी एक पीपीई किट दोन हजार रुपये किंमतीची खरेदी करण्यात आला. त्यातही मोठा घोळ करण्यात आला. तसेच रुग्णांना देण्यात आलेल्या आहाराचा खर्च आठ कोटी रुपये दाखवण्यात आला, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. ( बिकानेर अपघातीच भयानक भीषणता, 12 डब्बे घसरले, 4 डब्बे जमिनीवर कोसळले ) या सर्व बाबींचा हिशोब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वारंवार मागून देखील हिशोब समोर आणला जात नाही. जिल्हा प्रशासन उडवा-उडवीची उत्तरे देतंय. हा सगळा भ्रष्टाचार विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आशिर्वादामुळेच झाल्याचा देखील गंभीर आरोप माजी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी केलाय. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्याच्या सीमेवर लातूर जिल्ह्याच्या हद्दीत सर्वात मोठा जुगाराचा अड्डा देखील पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानं सुरु असल्याचा देखील आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला दुसरीकडे लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढताना दिसतोय. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 24 वरुन थेट हजाराच्या पुढे गेली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला लातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 24 होती. पण त्यानंतर ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत राहिली. ही रुग्णसंख्या इतकी वाढली की 12 जानेवारीला तब्बल 1095 नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची तारखेनुसार सविस्तर आकडेवारी 1 जानेवारी - 24 रुग्ण 2 जानेवारी - 27 रुग्ण 3 जानेवारी - 10 रुग्ण 4 जानेवारी - 28 रुग्ण 5 जानेवारी - 51 रुग्ण 6 जानेवारी - 68 रुग्ण 7 जानेवारी - 77 रुग्ण 8 जानेवारी - 114 रुग्ण 9 जानेवारी - 108 रुग्ण 10 जानेवारी - 155 रुग्ण 11 जानेवारी - 216 रुग्ण 12 जानेवारी - 434 रुग्ण एकूण सक्रिय रुग्ण - 1095
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.