चंद्रपूर, 22 फेब्रुवारी : क्रिकेटचा देव म्हटला जाणार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर अचानक आपल्या समोर येऊन उभा ठाकला तर काय होईल? बराच वेळ आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास नाही बसणार. अशीच काहीशी अवस्था चंदपूरच्या चिमूरमधील अलिझंझा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची झाली. त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ज्याला आतापर्यंत फक्त टीव्हीवर आणि पाठ्यपुस्तकातील धड्यात बघितलं, तो त्यांचा आवडता खेळाडू चक्क त्यांच्या समोर उभा होता.
इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकात कोलाज (बायोग्राफी) धड्यात ‘सचिन रमेश तेंडुलकर माझा आवडता खेळाडू’ हा धडा आहे. या धड्यातील नायक सचिनने साक्षात अलिझंझाच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी हितगूज केल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
सचिन ताडोबातील वाघांच्या भेटीसाठी शनिवारपासून चिमूर तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रपरिवारासोबत मुक्कामी आहे. सोमवारी अलिझंझा बफर गेटमधून दुपारच्या सफारीसाठी जात असताना पावणेतीनच्या सुमारास आदिवासीबहुल पाच-सहाशे लोकसंख्या असलेल्या अलिझंझा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अचानक भेट दिली. अनपेक्षित खुद्द सचिन शाळेत आल्याने मुख्याध्यापक रमेश बदके, शिक्षक मनिषा बावनकर आणि विद्यार्थ्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.
हे वाचा - सचिन तेंडुलकरने घेतला चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद! व्हिडिओ होतोय व्हायरल
हे वाचा - कसोटीत एक तप तर वनडेत 10 वर्षे पाहिली वाट, रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर मिळाली संंधी
सध्या सचिन त्याच्या रिटायरमेंटचा भरपूर आनंद घेत असल्याचे दिसत आहे. तो देशातील विविध ठिकाणी सहलीसाठी जात असतो, तेथील लोकल जेवणाचा स्वाद घेतोय, तो ज्या ठिकाणांना भेट देतोय, त्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Sachin tendulaker