ठाणे, 13 ऑक्टोबर : ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नल ते हायपरसिटी मॉल, वाघबीळ ब्रिज, घोडबंदर रोड या ठिकाणी आज १३ ते १६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविली आहे. वाहतूकीत बदल पुढील प्रमाणे प्रवेश बंद - मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग - अ) मुंबई ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. ब) मुंबई ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड/अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. प्रवेश बंद - मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग - मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. प्रवेश बंद - नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग - नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. (जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही गर्डर टाकण्याच्या वेळी आनंदनगर सिग्नल कट जवळ डावीकडे वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे हायपरसिटी मॉल कट जवळ उजवीकडे वळण घेवून मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.) गर्डर टाकण्याच्या वेळा खालील प्रमाणे - 1) दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत. २) दि. १४ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत. ३) दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत. ही अधिसूचना ही वरील नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे उप आयुक्त यांनी कळविले आहे. मेट्रोचे गर्डर कामाकरता वाहतूक करण्यात बंद आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.