मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पहिली ते चौथी शाळा पुन्हा सुरु करण्यावर जोर, टास्क फोर्ससोबत चर्चा करुन लवकरच घेणार निर्णय

पहिली ते चौथी शाळा पुन्हा सुरु करण्यावर जोर, टास्क फोर्ससोबत चर्चा करुन लवकरच घेणार निर्णय

आता प्राथमिक शाळा (Maharashtra School Reopen) सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे.

आता प्राथमिक शाळा (Maharashtra School Reopen) सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे.

आता प्राथमिक शाळा (Maharashtra School Reopen) सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 23 ऑक्टोबर: कोरोनाचा (Corona Virus) जसा प्रार्दुभाव कमी होत असल्यानं राज्य (Maharashtra State) हळूहळू अनलॉक (Unlock) होत आहे. राज्यात शाळा महाविद्यालये आता सुरु झाली आहेत. मात्र आता प्राथमिक शाळा (Maharashtra School Reopen) सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळाही (primary schools) लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारनं (State Government) दिलेत.

राज्यात इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असल्याचं समजतंय. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा करुन यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक ट्विट देखील केलं आहे.

शुक्रवारी वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्ह्यातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करत असताना जिल्ह्यातल्या शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत प्राथमिक शाळा सुरु करण्यावर अधिकारी सकारात्मक असून पुन्हा शाळा सुरु करण्यावर जोर आहे. या बैठकीत अधिकाऱ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि कोविड टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा- हिमाचल प्रदेशमध्ये बेपत्ता झालेल्या 11 ट्रेकर्सचा मृत्यू, 4 जणांचा शोध सुरु

या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणं. तसंच निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तसंच शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे सरकारचं उद्द‍िष्ट असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

निजामकालीन शाळांचा विकास आणि आदर्श शाळा योजनेबाबत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

First published:

Tags: School, Students