मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोकणातल्या तरुणांचा वानखेडेवर आवाज, रिफायनरीच्या विरोधात भर स्टेडिअममध्ये एल्गार; झळकवले टी-शर्ट

कोकणातल्या तरुणांचा वानखेडेवर आवाज, रिफायनरीच्या विरोधात भर स्टेडिअममध्ये एल्गार; झळकवले टी-शर्ट

वानखेडेवर कोकणातील (Konkan) रिफायनरी (Refinary) विरोधातला आवाज घुमलेला दिसला.

वानखेडेवर कोकणातील (Konkan) रिफायनरी (Refinary) विरोधातला आवाज घुमलेला दिसला.

वानखेडेवर कोकणातील (Konkan) रिफायनरी (Refinary) विरोधातला आवाज घुमलेला दिसला.

मुंबई, 23 एप्रिल: काल वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) IPL चा राजस्थान रॉयल विरुद्ध दिल्ली कॅपिटल (Rajasthan Royals vs Delhi Capital) या दोन टीममध्ये एक चुरशीचा सामना पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी आयपीएलच्या 15 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हंगामातील 34 व्या सामन्यात, जोस बटलरचे शतक आणि देवदत्त पडिककल (54) सोबतच्या 155 धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 222 धावा केल्या. मात्र या सामन्यादरम्यान दुसऱ्या एका गोष्टीची चर्चा रंगू लागली. वानखेडेवर कोकणातील (Konkan) रिफायनरी (Refinary) विरोधातला आवाज घुमलेला दिसला.

सध्या कोकणात रिफायनरी व्हावी की नाही यावर बरेच वाद होत आहेत. त्यातच या रिफायनरीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काल वानखेडे स्टेडिअमवर हजेरी लावली होती. या कार्यकर्त्यांनी सामना सुरु असतानाच आपला विरोध दर्शवला.या विरोधा दरम्यान त्यांनी टी शर्ट फडकवला आहे.

सामन्यात रिफायनरी विरोधी बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील आणि अन्य कोकणी तरुणांनी IPL मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप चे प्रायोजक असलेल्या सौदीच्या आरामको कंपनी जी कोकणात प्रस्तावित होऊ पाहणाऱ्या रिफायनरी प्रकल्पात 50 टक्के भागीदार आहे, तिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या कार्यकर्त्यांनी Aramco Go Back, एकच जिद्द रिफायनरी रद्द, रिफायनरी हटवा ,कोकण वाचवा अशी जोरदार घोषणाबाजी सामन्यादरम्यान केली.

या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, IPL सामने सुरू असताना हा आम्ही कंपनीला विरोध दाखवून दिला.

मार्च महिन्यात रिफायनरी विरोधात भव्य मोर्चा

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये रिफायनरी उभारण्याच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू आहेत. असं असताना गेल्या महिन्यात रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी विराट मोर्चा काढून हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. शहरातील कोदवली नदीतील खर्लीपात्र ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता. ‘जमीन आमच्या हक्काची..नाही कुणाच्या बापाची’, ‘एकच जिद्द ..रिफायनरी रद्द’, अशी जोरदार घोषणाबाजी मोर्चेकऱ्यानी दिल्या. ‘कोकण आहे ऑक्सिजनचे भांडार, येथे नको रिफायनरीचा बाजार’, अशा फलक घेऊन मोर्चेकरी रस्त्यावर उतरले होते. बारसू-सोलगाव-धोपेश्‍वर पंचक्रोशीमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करू नये, अशी मागणी यावेळी केली गेली.

First published:

Tags: Ipl, Ipl 2022, Konkan, Wankhede stadium