पैठण, 22 जुलै : पैठण नगरपरिषदेने वीज बिल थकवल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून पैठण शहर अंधारात आहे. रहिवाशांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधी शिवसेनेचे शहरप्रमुख तुषार पाटील यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये पथदिवे आणि हायमास्ट चालू नाही झाले, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेने दिला आहे. दरम्यान संदिपान भुमरे यांचा मतदार संघ असल्याने बंडखोर भुमरेंचा सामना शिवसैनिकांशी होण्याची शक्यता आहे. (Shiv Sena Sandeepan Bhumre) विशेष म्हणजे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्या पैठणच्या दौऱ्यावर असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये ऊर्जा संचारली असल्याने या इशाऱ्याला अधिकच महत्त्व आले आहे. या आंदोलनातून बंडखोर आमदार संदिपान भुमरे आणि मूळ शिवसैनिक यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळू शकते. हे ही वाचा : Kolhapur Sharad Pawar : कोल्हापूरच्या बंडखोर खासदारांना पाडण्यासाठी शरद पवारांचा गेम प्लॅन, मुश्रीफांना कामाला लागण्याचे आदेश आदित्य ठाकरे संदिपान भुमरेंना काय बोलणार शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेनिमीत्त ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. ते विविध ठिकाणी सभांना संबोधित करणार असल्याने त्यांच्याबोलण्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान ते संदीपान भुमरे यांच्या मतदार संघातही पोहोचणार आहेत ते तिथे काय बोलतात याकडे सर्व शिवसैनिकांच्या नजरा आहेत. आदित्य ठाकरे गुरुवारी भिवंडी, शहापूर (ठाणे), इगतपुरी आणि नाशिकचा दौरा करणार आहेत, अशी माहिती शिवसेना आमदार आणि औरंगाबाद पक्षाचे अध्यक्ष अंबादास दानवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. त्यानंतर ते नाशिकमधील मनमाड येथे सभेला संबोधित करणार आहेत. हे ही वाचा : ‘माझं काय चुकलं?’; आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सांगणार शिवसेनेचे हे चुकलेले निर्णय आज दुपारी (दि. 22) ते औरंगाबादला पोहोचतील आणि संत एकनाथ रंगमंदिर सभागृहात सभेला संबोधित करणार असल्याची माहिती आहे. शनिवारी ते औरंगाबादमधील पैठण आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे रॅली काढणार असल्याचे सांगण्यात आले. त्याच दिवशी ते अहमदनगरमधील शिर्डीलाही भेट देतील आणि त्यानंतर मुंबईला परत जाणार असल्याची महिती दानवे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.