Home /News /maharashtra /

12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड

12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड

ही माहिती समोर आल्यानंतर मिरजोळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी, 22 फेब्रुवारी : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निखिल अरुण कांबळे या तेरा वर्षीय रत्नागिरीतल्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मिरजोळे परिसरात खळबळ उडाली आहे. रत्नागिरीपासून जवळच असलेल्या मिरजोळे भागातल्या माळरानावरच्या एका चरात निखिलला मारुन टाकून त्याच्या मृतदेहावर दगड रचण्यात आले होते. निखिलच्या आईने आपल्या मुलाच्या मृतदेहाची ओळख पटवली असून या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी हादरून गेली आहे. रत्नागिरीच्य सेंट थॉमस हायस्कूल मध्ये सातवीत शिकणारा निखिल 11 फेब्रुवारीला बेपत्ता झाला होता. 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार ठरला घातवार, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू निखिलची हत्या नेमकी कुणी अणि कशासाठी केली? त्याच्या हत्येत किती जणांचा सहभाग होता? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी पुढील तपास आता रत्नागिरी पोलीस करत आहेत. 
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ratnagiri, Ratnagiri police

पुढील बातम्या