मुंबई, 22 फेब्रुवारी: बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकनं चिरडल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. अलिबाग आणि जळगावमधील या घटना असून यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही विदार्थी जखमी झाले आहेत.
अलिबागमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागेवर मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तिनवीरा गावाजवळ हा अपघात झाला. अलिबागकडून वडखलच्या दिशेने जाताना व समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने (ट्रक) ओव्हर टेक करताना बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडले. त्यात एका विद्यार्थ्याचा जागसमोरून येणाऱ्या टिप्पर (ट्रक) ला ठोकर दिल्याने अपघात झालेला आहे.
1. आकाश संदीप थळे रा कोपर ता अलिबाग (जखमी)
2. शादाब अहमद छापेकर रा मैनुशेठ वाडा (जखमी)
3. योगेश रामबकास उमरिया (मयत) रा कोपर रेल्वे कॉलनी
दुसरीकडे, बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परीक्षा देऊन घरी परतत असताना दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. यात अदनान खान या विद्यार्थाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. कुसुंबा गावाजवळील हॉटेल नीलांबरी जवळ हा अपघात झाला.
जळगाव शहरातील मिल्लत ज्यूनिअर कॉलेजचे विद्यार्थी अदनान खान (वय 17, रा. अक्सानगर) व शेख मोहंमद शेख अब्दुल रहमान कुरेशी (वय 17, रा. तांबापुरा) या दोघांचा आज 11 ते 2 असा हिंदीचा पेपर कुसुंबा येथील स्वामी समर्थ विद्यालय येथे होता. पेपर सुटल्यानंतर हे दोघं जण आपल्या दुचाकीवरून घरी परत येत होते.
साधारण सव्वा दोन वाजेच्या सुमारास हॉटेल निलांबरी जवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरसोबत त्यांच्या दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. यात दुचाकी चालविणारा अदनान खान हा जागीच ठार झाला. तर शेख मोहंमद हा गंभीर जखमी झाला आहे . त्याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे कळते. दरम्यान, या अपघातात ट्रॅक्टर चालक देखील जखमी झाल्याचे कळते. दरम्यान मयत अदनानचे वडील रिक्षाचालक आहेत. अपघातानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.