रत्नागिरी,24 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृद्धाच्या साधेपणाचा फायदा घेत बँकेतून तब्बल 85 लाख 82 हजार 161 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Ratnagiri Khed Crime) या संधर्भात अरविंद चंदुलाल तलाठी या 66 वर्षीय वृद्धाने खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
विक्रम सरोही, श्रीवास्तव, राणा, कविता शर्मा, अभिजित बॅनर्जी, अजित मुदलिक, विठ्ठलभाई पटेल, अभय शुक्ला, प्रमोद ठाकूर या नऊ जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद तलाठी यांच्या पत्नीच्या नावाचा संदर्भ देत त्या वयस्कर व्यक्तीचा विश्वास संपादन करत.
हे ही वाचा : शाळा सुटली अन् 13 वर्षांची श्रद्धा जीवाला मुकली, घरी येताना ट्रॅक्टरखाली सायकल सापडली
त्याच्याकडून बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या तीन बँकांच्या खेड शाखेतून तब्बल 85 लाख 82 हजार 161 रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या संदर्भात रत्नागिरी पोलिसांनी तपास यंत्रणा सज्ज केली आहे. आज पर्यंत खेड मधील हि सर्वात मोठी फसवणुकीची चोरी ठरली आहे.
रत्नागिरीत मुबंईतील सोने चांदी व्यापाऱ्याची हत्या
व्यावसायिक कामासाठी रत्नागिरीत आलेले मुंबईतील प्रसिद्ध सोने - चांदी व्यापारी कीर्ती कोठारी रत्नागिरी बाजारातून गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती रत्नागिरीत पसरताच एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई येथून व्यावसायिक कामासाठी सोने चांदीचे व्यापारी कीर्तिकुमार कोठारी (55) हे राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले आहेत. कीर्तिकुमार हे मीरा भाईंदर येथील असून, ते रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते.
हे ही वाचा : वाजत-गाजत सासरी गेली, मनसोक्त नाचली पण..; लग्नानंतर सहाव्या दिवशीच नवरीचं भयंकर कांड
आठवडा बाजार येथील एका लॉजमध्ये ते राहिले होते. सोमवारी रात्री ते एमजी रोड येथील एका ज्वेलर्सकडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर त्यांचा पत्ता लागत नाही. यासाठी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याजवळ सुमारे 10 लाखांचे दागिने होते, अशी चर्चा आहे.