जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण, Orange Alert ही कायम

मुंबईत पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण, Orange Alert ही कायम

मुंबईत पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण, Orange Alert ही कायम

Mumbai Rain Updates: मुंबईत (Mumbai Rain) आज पावसाने विश्रांती घेतली आहे. ढगाळ वातावरण अजूनही असून हवामान खात्याने पुढील 48 तास ऑरेंज अलर्ट दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून: मुंबईत (Mumbai Rain) आज पावसाने विश्रांती घेतली आहे. ढगाळ वातावरण अजूनही असून हवामान खात्याने पुढील 48 तास ऑरेंज अलर्ट दिला आहे. काल ठिकठिकाणी पाणी भरलं होतं. आज मात्र पाऊस नसल्याने मुंबईकरांना थोडा फार प्रमाणात दिलासा मिळत आहे. (Mumbai, Thane Weather Updates) आज मुंबई, ठाणे (Thane), पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टीचे ढग दक्षिणेकडे वळल्याने मुंबईचा रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट मध्ये बदलला आहे. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा (Heavy rainfall) हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड वर काल पाणी भरल्याने 4 तास रस्ते वाहतूक ठप्प होती. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अलर्टनुसार, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी रविवार, सोमवारी रेड अलर्ट आहे. 13 जून 2021 रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर सोमवारी जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai , rain , thane
  • First Published :
जाहिरात
जाहिरात