खळबळजनक! बीडमध्ये रेशनची साठेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, भाजप नेत्याविरुद्ध गुन्हा

गोरगरीबांना पोटभर अन्न मिळेल, या भावनेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज सरकार स्वस्त धान्य दुकानात अन्न-धान्य उपलब्ध करुन देत आहे. तर दुसरीकडे...

गोरगरीबांना पोटभर अन्न मिळेल, या भावनेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज सरकार स्वस्त धान्य दुकानात अन्न-धान्य उपलब्ध करुन देत आहे. तर दुसरीकडे...

  • Share this:
बीड, 7 मे: लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना पोटभर अन्न मिळेल, या भावनेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज सरकार स्वस्त धान्य दुकानात अन्न-धान्य उपलब्ध करुन देत आहे. तर दुसरीकडे काही व्यापारी रेशन मालाची साठेबाजी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशाच रेशन मालाची साठेबाजी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बीड पोलिसांनी काल (बुधवार) रात्री उशीरा ही धडक कारवाई केली. संपूर्ण महाराष्ट्रात हे नेटवर्क सक्रीय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा..कोरोना योद्धांना सॅल्युट! एक वर्षाच्या चिमुरड्याला खेचून आणलं मृत्यूच्या दारातून बीड जिल्ह्यातील गेवराई शहरालगत पांढरवाडी रोडवरील राजवीर पंपाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये रेशनच्या धान्याचा साठा आढळून आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 6 ट्रकसह 450 पोते गहू, 190 पोते तांदूळ व 20 पोते साखर जप्त केली आहे. किमान संकटकाळात तरी स्वस्त धान्य दुकानावरील माल गरजूंपर्यंत पोहोचावा, अशी मागणी होत असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी छापा टाकलेले गोडाऊन भाजप कार्यकर्ता अरुण म्हस्के यांच्या मालकीचं आहे. या प्रकरणी अरुण म्हस्केविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोण आहे अरुण म्हस्के? गेवराई पोलीस ठाण्यात अरुण म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव यांनी दिली. अरुण मस्के हे गेवराई येथील भाजपा नगरसेविका सविता मस्के यांचे पती असून संबंधिक गोडाऊन त्यांच्या मालकीचे आहे. तसेच अरुण मस्के हे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांचे विश्वासु आणि जवळचे कार्यकर्ते आहेत. हेही वाचा..तरुणांनाही लाजवेल असा निवृत्तीला आलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हा विक्रम! जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता गोंदिया आणि मध्यप्रदेशमधील पावत्या असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान या साठेबाजीच्या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, कोरोणाच्या संकटकाळात सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त धान्य दुकानाऐवजी या माफियाकडे कसं पोहोचतं? महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याची माहिती नव्हती का ? असा सवाल आता उपस्थित होत आहेत,
First published: