जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आणखी एक बळी! अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानं पीडितेने उचललं भयावह पाऊल

आणखी एक बळी! अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानं पीडितेने उचललं भयावह पाऊल

आणखी एक बळी! अमरावतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानं पीडितेने उचललं भयावह पाऊल

बलात्कारातून गर्भवती राहिल्यानं (minor girl become pregnant after raped) अमरावतीतील एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 11 सप्टेंबर: गेल्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रात बलात्काराच्या (Rape in maharashtra) अनेक गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. पुण्यातील एका मुलीवर तेरा जणांनी सामूहिक बलात्कार (Gang rape in Pune) केल्यानंतर, मुंबईतील साकीनाका (Saki naka rape) येथे नराधमांनी निर्भया बलात्कार प्रकरणाची (Nirbhaya rape case) आठवण करून दिली आहे. यानंतर आता बलात्कारातून गर्भवती राहिल्यानं (minor girl become pregnant after raped) अमरावतीतील एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय पीडित तरुणीवर तिच्याच गावातील एकानं बळजबरी करत बलात्कार केला होता. बदनामीच्या भीतीनं पीडितेनं या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. यानंतर आरोपीनं जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अनेकदा बळजबरी केली आहे. यातूनच पीडित युवती 7 महिन्यांची गर्भवती राहिली होती. हेही वाचा- वेडी ठरवत पतीनेच पत्नीला भोंदूबाबाच्या स्वाधीन केलं; घृणास्पद घटनेनं पुणे हादरलं पण गर्भवती असल्याची  बाब गावातील लोकांना कळाली तर काय होईल? या भीतीतून पीडित तरुणीनं 29 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण त्यानंतर मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येवदा पोलीस ठाण्यात जाऊन गावातील एका युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो, बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणं अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा- पोलीस अधिकारी असल्याचं सांगत शिक्षिकेवर बलात्कार; शीतपेय पाजून केला गैरप्रकार गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत येवदा पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या आरोपी तरुणाची चौकशी करत असून पुरावे गोळे केले जात आहेत. या घटनेचा पुढील तपास येवदा पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात