मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद? भाजपला दिसतायत 5 राजकीय फायदे

शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद? भाजपला दिसतायत 5 राजकीय फायदे

 नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.  त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती.

नारायण राणेंना मंत्रिपद देऊन भाजपनं अनेक हेतू साध्य करण्याच्या दिशेनं पावलं टाकली असल्याची चर्चा होत आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 8 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मंत्रिपद (Ministry)बहाल करण्यात आलं असून सूक्ष्म, लघू आणि मध्यम प्रकल्प खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यातून भाजपनं (BJP) महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) आणि विशेषतः शिवसेनेला (Shivsena) आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राणेंना मंत्रिपद देऊन भाजपनं अनेक हेतू साध्य करण्याच्या दिशेनं पावलं टाकली असल्याचीही चर्चा होत आहे.

कट्टर शिवसैनिकापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा राजकीय प्रवास शिवसेनेसोबत केल्यानंतर नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि तिथंदेखील ते कॅबिनेट मंत्री राहिले. त्यानंतर 2019 साली त्यांनी काँग्रेसला अलविदा करत स्वतःच्या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर ते भाजपकडून राज्यसभेवर गेले. महाराष्ट्रातील राजकारणात प्रभावशाली राहिलेल्या राणेंचा उपयोग करून महाराष्ट्रात शिवसेना आणि मविआ सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजपनं केला असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेवर आरोप करण्यात पुढाका

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर नारायण राणेंनी थेट शिवसेनेवर आरोप करत आदित्य ठाकरे हेच या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. अर्थात, तो आरोप नंतर सिद्ध होऊ शकला नाही. मात्र यामुळं राणेंची शिवसेनेविरुद्धची आक्रमकता देशपातळीवर पोहोचली.

कोकणात प्रभाव

नारायण राणेंचा कोकणात अजूनही दांडगा प्रभाव आहे. कोकणातील बहुतांश ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व असलं तरी त्याला राणेंच्या मदतीनंच आव्हान देता येऊ शकतं, याची जाणीव भाजपला आहे. राणेंना मंत्रिपद मिळण्यात ही गोष्ट महत्त्वाची ठरल्याचं सांगितलं जातं

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

2022 च्या सुरुवातीला मुंबई आणि ठाण्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला शह देण्यासाठी राणेंच्या नेतृत्वाखाली रणनिती आखणं हाच पर्याय भाजपसाठी योग्य असल्याचं मानलं जात आहे. त्यासाठी भाजपला राणे हवे आहेत.

मराठा समाजाचे नेतृत्व

सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्यामुळं मराठा समाज मविआ सरकारवर नाराज आहे. भाजपच्या सत्ताकाळात हे आरक्षण देण्यात आलं आणि मविआ सरकारच्या काळात ते रद्द झालं, अशी परिस्थिती असल्यामुळं मविआतील तिन्ही पक्षांवर मराठा समाज नाराज असल्याचं सांगितलं जातं. अशा परिस्थितीत राणेंना मंत्रिपद देऊन एक प्रकारे मराठा समाजाला खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

हे वाचा - ईडी कार्यालयात जाण्याआधी एकनाथ खडसेंनी केला मोठा खुलासा

संघटन कौशल्य

शिवसेनेत असताना नारायण राणेंचं संघटन कौशल्य दिसून आलं होतं. शिवसैनिक म्हणून काम करताना राणेंचं संघटन कौशल्य पाहून खुद्द बाळासाहेब ठाकरेदेखील प्रभावित झाले होते. राणेंना भाजपची ताकद मिळाली, तर पुन्हा एकदा राणे तसाच चमत्कार घडवू शकतात, असा विश्वास भाजपला आहे.

First published:

Tags: BJP, Narayan rane, Shivseana, Union cabinet