मुंबई, 14 जून: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट (Prashant Kishor's Meeting With Sharad Pawar) घेतली. या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री (Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale) रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच 2024 ला पुन्हा नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
2014 ला प्रशांत किशोर भाजपबरोबर होते. पण 2019 ला त्यांच्याशिवाय भाजपनं 303 जागांवर विजय मिळवला. किशोर यांच्याशिवाय भाजपनं अनेक राज्यातील निवडणुका जिंकल्या आहेत, असं आठवले म्हणालेत.
पुढे त्यांनी आपल्या शैलीत यावर प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले म्हणाले की, प्रशांत किशोर के मत बनो आदि, नरेंद्र मोदी इज पक्के आंबेडकरवारी। 2024 में फिर से पीएम बनेंगे मोदी।
हेही वाचा- परमबीर सिंह यांची तूर्तास अटक टळली, राज्य सरकारची न्यायालयात हमी
यावेळी आठवलेंनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. विरोधी पक्ष एकवटलेले नाहीत आणि त्यांची एकसारखी मतं नाहीत. पण एनडीएतील प्रत्येक पक्ष हा पंतप्रधान मोदींसोबत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मोठा विजय मिळणार असल्याचा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.
शरद पवार- प्रशांत किशोर यांच्यात तब्बल 3 तास भेट
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास भेट झाली. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. बंगालमध्ये प्रशांत किशोर यांचा ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या विजयात मोठा वाटा आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर राजकीय रणनितीकार राहणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली.
हेही वाचा- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात राज्यातून 'या' खासदार महिलेच्या नावाची चर्चा
पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली होती. मात्र, भाजपला याठिकाणी तीन अंकी आकडाही गाठता आला नाही. ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये बहुमतानं विजय मिळवला आहे. यानंतर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकाचा चेहरा म्हणून कोण असणार यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत. यूपीएच्या नवीन नेतृत्वाचाही सध्या शोध सुरु आहे. यामध्ये शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाणार का? अशाही चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ramdas athavale, Sharad pawar