हिंगोली, 17 मे : काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पार्थिवावर आज हिंगोलीत (Hingoli) अंत्यसंस्कार (Funeral) झाले. हिंगोलीतील कळमनुरीच्या मसोड या मूळगावी सातव अनंतात विलिन झाले. मुलगा पुष्कराज यांने सातव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मात्र यावेळी सातव यांच्या मुलीनं असं काही म्हटलं की, त्याठिकाणी असलेल्या सर्वांचंच हद्य पिळवटून निघालं.
राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी सातव यांच निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव हिंगोलीला आणण्यात आलं. सोमवारी कळमनुरीच्या मसोड या त्यांच्या मूळ गावी सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सातव यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे काही नेते उपस्थित होते. राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज यानं सातव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रु तराळले होते.
(वाचा-चक्रीवादळाने रडवलं, मात्र कोरोनात दिलासा; नव्या रुग्णांसह मृत्यूच्या संख्येत घट)
यावेळी अत्यंत भावनिक आणि हृदय पिळवटून टाकणारा असा एक प्रकार घडला. सातव यांचा मुलगा पुष्कराज यानं मुखाग्नी दिल्यानंतर जेव्हा चिता पेटली त्यावेळी सातव यांच्या मुलीनं आईला घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर ती जे काही बोलली ते सर्वांना स्तब्ध करणारं होतं. ईटिव्ही भारतच्या वृत्तानुसार, यावेळी सातव यांच्या मुलीनं ''मम्मी बघ पप्पांना चटके बसत आहेत'' असं म्हणत अश्रुंना वाट मोकळी करून दिली. मात्र पिता गमावलेल्या च्या मुलीची समजूत कशी काढायची हे कुणालाही कळत नव्हतं. त्यामुळं सगळे जणू सुन्न झाले होते.
(वाचा-परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; घाडगेंच्या तक्रारीनंतर सीआयडीकडून चौकशी सुरू)
राजीव सातव यांना गांधी कुटुंबीयांच्या जवळील मानलं जातं होतं. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचे विश्वासू म्हणून राजीव सातव यांना ओळखलं जायचं. राजीव सातव राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य मानले जात. मोदींच्या लाटेतसुद्धा शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्यानं काँग्रेसचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funeral, Rajiv Satav