मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महत्त्वाची बातमी! आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती, आरोग्य मंत्र्यांची माहिती

महत्त्वाची बातमी! आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती, आरोग्य मंत्र्यांची माहिती

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

'सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे'

Rajesh Tope health department recruitment भविष्यातही कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य संत्रणा सज्ज असावी यासाठी तातडीनं भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

मुंबई, 06 मे: कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा (Health Infrastructure) हा सर्वात महत्त्वाचा घटक बनला आहे. पण राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त (Vacant Posts) आहेत. अशा 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा ही समस्या देखील आहे. त्यामुळे ऑक्सिजन (Oxygen) आणि लसींच्या पुरवठ्याबाबतही (Vaccine Supply) केंद्राशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य विभागातील 16 हजार पदे तातडीने भरली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. या 16 हजार पदांमध्ये क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी 2 हजार अशी 4 हजार पदे भरली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही टोपे म्हणाले. (हे वाचा- कोरोना काळात आईचं दूध मिळेना; तान्ह्या बाळांना दूध देण्यासाठी सरसावल्या मात) लसींचा तुटवडा लसीकरणाच्या मुद्द्यावरून टोपे यांनी पुन्हा एकदा केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नसल्याचं म्हटलं आहे. केंद्राकडून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी असल्याचं टोपे म्हणाले. 45 वर्षावरील ज्या नागरीकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी लस योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याचं ते म्हणाले. त्यामुळं राज्यात 45 वरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नसल्याची तक्रार करताहेत. त्यामुळं राज्य सरकार याबाबत धोरणामात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे, असंही टोपे म्हणाले. 18 ते 44 वयोगटासाठी राज्य सरकारनं खरेदी केलेले कोव्हॅक्सिन 45 वरील वयोगटातील नागरिकांसाठी देण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. केंद्रानं जास्तीच्या कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक) लस द्याव्या अशी मागणी राज्य केंद्राकडं करणार आहे. (हे वाचा-‘इतक्या पैशांत शेकडोंचं लसीकरण होईल’; लेहंग्याची किंमत ऐकून व्हाल थक्क) ऑक्सिजनचाही तुटवडा येणार?   कर्नाटकवरून येणारा ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यामुळं अडचणी येणार असल्याचं टोपे म्हणाले. राज्याच्या वाट्याचा येणारा ऑक्सिजन थांबवणे योग्य नाही. याबाबत वरिष्ठ स्तरावर आम्ही बोलत आहोत तसेच मुख्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात रोज 1750 मेट्रीक टन ऑक्सीजनची गरज आहे. त्यामुळं कर्नाटकहून येणारा ऑक्सिजन थांबवल्यास अडचण येणार असल्याचंही टोपे म्हणाले. एकूणच कोरोनाची सध्याची बिकट होत असलेली स्थिती आणि भविष्यात आणखी लाटा येण्याचं भाकित यासाठी सरकारनं आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करून भविष्यातील संकटासाठी सज्ज राहण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र कोरोनाच्या या संकटात ही भरती नेकमी कशी होणार हेही पाहावं लागणार आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply, Rajesh tope

पुढील बातम्या