Home /News /lifestyle /

कोरोनाने हिरावली जन्मदाती; तान्ह्या बाळांना दूध देण्यासाठी सरसावल्या आई

कोरोनाने हिरावली जन्मदाती; तान्ह्या बाळांना दूध देण्यासाठी सरसावल्या आई

ऑक्सिजन, बेड्स, औषधं याप्रमाणे कोरोना काळात आईच्या दुधाचीही (Breastmilk) गरज भासत आहे.

मुंबई, 06 मे: देशात सध्या कोरोनामुळे लोक ऑक्सिजन (oxygen cylinders), बेड्स, औषधांसाठी सोशल मीडियावर मदत मागत आहेत. यासोबतच नवजात बालकांसाठी दूध दान करण्याचं देखील स्तनदा महिलांना आवाहन केलं जातं आहे. अनेक गर्भवती महिला आणि स्तनदा म्हणजेच नुकतंच बाळाला जन्म दिलेल्या महिलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. अनेक महिलांचा या विषाणूमुळे जीव गेला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या तान्ह्या बाळांना आईचं दूध (breast milk donation) मिळत नसल्यानं अडचणी वाढत आहेत. अशाच अनाथ बाळांसाठी स्तनदा माता सरसावल्या आहेत. गर्भवती महिलेला कोरोना झाल्यास तिच्या आरोग्याला धोका असतो. मात्र गर्भातील बाळाला तेवढा धोका नसतो. सुरू असेल्या एका संशोधनानुसार, कोरोनाबाधित मातांच्या तुलनेत बालकांना कमी धोका दिसून आला आहे.  या अभ्यासानुसार शेवटच्या तिमाहीत गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेआधी प्रसूती होण्याचा धोका संभवतो. प्रत्येक नवजात बाळासाठी आईचं दूध खूप गरजेचं असतं. खासकरून वेळेआधी जन्मलेल्या (प्रीमॅच्युअर) बाळांसाठी. कारण अशा बाळांची रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत आणि वजन कमी असतं. त्यामुळे आईच्या दुधातून त्यांना आवश्यक ती पोषक तत्वे आणि अॅलर्जी तसंच इतर संसर्गाशी लढण्याची ताकद मिळते. पण जर त्या बाळाच्या कोरोनाग्रस्त आईचा मृत्यू झाला किंवा काही कारणामुळे ती आपल्या दूध देऊ शकली नाही, तर अशा बाळांना आईचं दूध मिळत नाही. या बाळांना दूध पाजण्यासाठी अनेक स्तनदा मातांनी पुढाकार घेतला आहे. त्यापैकीच एक विपल धवल चौधरी या आहेत. हे वाचा - मातांनो सावधान! दुसऱ्या लाटेत बाळांना Coronaचा धोका वाढला विपल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला बाळाला जन्म दिला आहे. आता त्या आपलं दूध दान करत आहेत.  याहू फायनान्सच्या वृत्तानुसार विपल चौधरी यांनी त्यांची एक आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, "21 वर्षांपूर्वी त्यांच्या वहिनीने प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला होता. मात्र ती तिच्याच बाळाला दूध पाजू शकत नव्हती. पण त्या काळात भारतात स्तनदा मातांनी दूध दान करण्याची पद्धत रूढ नव्हती त्यामुळे तशी सुविधाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे बाळासाठी दूध दान करेल,अशी महिला शोधणं कठीण गेलं होतं. माझ्याच घरी अनेक वर्षांपूर्वी ही घटना घडल्याने दूध दान करण्याचं महत्त्व सगळे जाणत होते त्यामुळे कोणती अडचण आली नाही. मी दुधाचं दान केल्यानं माझ्यासह माझे कुटंबीय देखील खूश आहेत" विपल यांनी आणखी दूध साठवलं आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्या हे दूध दान करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वेच्छेने दूध दान करणारं आणखी एक नाव म्हणजे सफूरा झरगर. सफूरा या स्टुडंट अक्टिव्हिस्ट असून CAA विरोधातील आंदोलनादरम्यान त्यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. सफूरा यांनी ट्वीट करून कोणालाही मानवी दुधाची गरज असल्यासं त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं. या कठीण काळात सफुरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अनेक नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनी Blood doante करू शकता? सरकारने केला मोठा बदल कोविड-19 मुळे आपल्या मुलांना दूध पाजू न शकणाऱ्या मातांच्या मदतीसाठी ‘द दिल्ली कमीशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स ’(Delhi Commission for Protection of Child Rights) या संस्थेने हेल्पलाईन (+91 9311551393) सुरू केली आहे. ज्या स्तनदा माता आता अनाथ मुलांच्या मदतीसाठी आपलं दूध देऊ इच्छित असतील त्यांनी संपर्क करावा असं आवाहन ही हेल्पलाईन करत आहे. या कोरोनाकाळात अनेक बाळांची आई त्याच्या जन्मानंतर दगावते अशा बाळांनाही या दुधाची गरज भासू शकते. त्यामुळे इतर गरजांप्रमाणे मातेच्या दुधाची गरज भागवण्यासाठी या सामाजिक संस्था करत असलेला उपक्रम स्तुत्य आहे.
First published:

Tags: Coronavirus, Small baby

पुढील बातम्या