जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेंचं अचूक टायमिंग, भाजप-सेनेच्या स्नेहभोजनावेळीच 'वर्षा'वर!

राज ठाकरेंचं अचूक टायमिंग, भाजप-सेनेच्या स्नेहभोजनावेळीच 'वर्षा'वर!

राज ठाकरे यांनी शिंदेंना दसरा मेळाव्याच्या वादात पडू नये असा सल्लाही दिला होता.

राज ठाकरे यांनी शिंदेंना दसरा मेळाव्याच्या वादात पडू नये असा सल्लाही दिला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) , भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेचा गट यांच्यातली जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे, त्यातच आता राज ठाकरे यांनी अचूक टायमिंग साधलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) , भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेचा गट यांच्यातली जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे, त्यातच आता राज ठाकरे यांनी अचूक टायमिंग साधलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे गेले आहेत. वर्षा बंगल्यावरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे गेले असले, तरी त्यांच्या या टायमिंगची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. वर्षा बंगल्यावर आज भाजप आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते तसंच आमदारांच्या स्नेहभोजनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या काही वेळ आधीच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत. आता राज ठाकरे भाजप-शिवसेनेच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

News18

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. तसंच मागच्या काही दिवसांमध्ये भाजप नेतेही अनेकवेळा राज ठाकरेंच्या घरी गेले होते. तेव्हापासून या तिन्ही पक्षांमध्ये होत असलेल्या जवळीकीची चर्चा सुरू झाली आहे. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा संपवून पुन्हा दिल्लीला गेले. या दौऱ्यात अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. अमित शाह यांच्या मिशन मुंबईच्या रणनितीनंतर एकाच दिवसात राज ठाकरे भाजप-शिवसेनेच्या बैठकीवेळी वर्षावर जात असल्यामुळे पुन्हा एकदा तिन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात