जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MONSOON ALERT: पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह पाऊस, हवामान खात्याचा इशारा

MONSOON ALERT: पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह पाऊस, हवामान खात्याचा इशारा

MONSOON ALERT: पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह पाऊस, हवामान खात्याचा इशारा

राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत जोरदार (Rains with thunder expected in next 4 to 5 days) गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 ऑक्टोबर : राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत जोरदार (Rains with thunder expected in next 4 to 5 days) गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात सध्या मान्सूनचे ढग दाटून आले असून काही भागात (Rains expected in some parts of Maharashta) पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात थोड्याफार फरकाने पावसाळी वातावरण राहणार आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारच्या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील डोंगराळ भागात पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याचा अंदाज असून इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जाहिरात

या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस समुद्रकिनारच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वाचा - संतापजनक! बुलडाण्यात पोटचा लेकच बनला नराधम; जन्मदात्या आईवर अतिप्रसंगाचा प्रयत्न विश्रांतीनंतर पुन्हा सुरुवात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून शेतकऱ्यांनी पिकांची काढणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या सरी पुन्हा कोसळणार असल्यामुळे कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण कऱण्याची मोठी जबाबदारी शेतकऱ्यांवर असणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं उन्हात वाळवायला सुरवात केली आहे. त्यामुळे अचानक कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पिकांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना सावधानता बाळगावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात