हिंगोली, 13 जुलै : राज्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू (Maharashtra heavy rainfall) असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाऊस होत असल्याने पिकांबरोबर नागरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. (heavy rainfall crop damage) दरम्यान एका हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने कित्येक जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Farmers in Hingoli district have been affected financially and mentally due to heavy rains) याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अतिवृष्टीने जमीनी वाहून गेल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील 15 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. (hingoli rai update)
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरुंदा तसेच परिसरातील गावांच्या शेतातील जमिनी खरडून गेल्या आहेत. सुमारे 15 हजार हेक्टरवरील खरीप पिके, फळपिके, भाजीपाला, बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लहान मोठी मिळून सुमारे शंभर जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर शेकडो घरांची पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हे ही वाचा : Maharashtra Rains Update: राज्यात पावसाची संततधार सुरुच, जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; अनेक नद्यांना पूर
दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे आसना 400 ते 450 घरांमध्ये सुमारे पाच फूट नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा, किन्होळा, पाणी शिरल्याचे कळताच जिल्हा प्रशासनाने टाकळगाव, इंजनगाव, रुज आदी गावांतील तातडीने मदत कार्य करून संबंधित ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
पूर परिस्थितीची माहिती मिळताच शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळगे यांनी गावात जाऊन ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
प्राथमिक अंदाजानुसार 50 ते 60 जनावरे, 30 ते 35 शेळ्या दगावल्याची शक्यता आहे. तसेच झालेल्या नुकसानीबाबतची माहिती घेण्यात येत आहे. टाकळगाव येथील दोन शेतकरी, इंजनगाव येथील दोन शेतकरी अशा एकूण चार शेतकऱ्यांना पथकाव्दारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
चांदा ते बांदा पावसाचे थैमान
जून महिन्यात दांडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार आगमन केलं. राज्यातीव विविध भागात जोरदार पाऊस बसत आहे तर काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. प्रचंड पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गावं, वस्त्या पाण्याखाली गेल्या आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची संततधार सुरुच आहे.
हे ही वाचा : सीएम शिंदेंना गुरू पोर्णिमेलाच धनुष्यबाण आणि उद्धव ठाकरेंचा विसर, चर्चेला उधाण
पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Farmer protest, Monsoon, Rainfall