मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Rain Alert in Maharashtra : बाप्पाच्या निरोपाला पाऊस सर्जीकल स्ट्राईक करणार ‘या’ जिल्ह्यात Yellow Alert

Rain Alert in Maharashtra : बाप्पाच्या निरोपाला पाऊस सर्जीकल स्ट्राईक करणार ‘या’ जिल्ह्यात Yellow Alert

पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर मुंबईसह सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधारेने झोडपले

पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर मुंबईसह सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधारेने झोडपले

पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर मुंबईसह सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधारेने झोडपले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 सप्टेंबर : राज्यात मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरू केले आहे. काल (दि. 07) राज्यात कोल्हापूर, सातारा, पुण्यासह विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान गणेश विसर्जनावर पावसाचे सावट निर्माण झाले असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

मागच्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर मुंबईसह सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधारेने झोडपले. नागपुरातही ढगफुटीसदृश पाऊस झाला. दरम्यान झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने कित्येक तास वाहतूक ठप्प झाली होती.

हे ही वाचा : Anant Chaturdashi Katha : अनंत चतुर्दशी का साजरी केली जाते? काय आहे महत्त्व आणि पौराणिक कथा

असा असेल पावसाचा अंदाज

8 सप्टेंबर : सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.

9 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट

10 सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे ही वाचा : Pitru Paksh 2022 : पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान

11 सप्टेंबर : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

First published:

Tags: Mumbai rain, Pune rain, Rain in kolhapur, Weather update, Weather warnings