मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आत्महत्या करणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसाने वाचवले, पाहा, घटनेचा थरारक VIDEO

आत्महत्या करणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसाने वाचवले, पाहा, घटनेचा थरारक VIDEO

एका महिला आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून लोकलच्या दिशेने धावत सुटली होती.

एका महिला आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून लोकलच्या दिशेने धावत सुटली होती.

एका महिला आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून लोकलच्या दिशेने धावत सुटली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 ऑगस्ट : आतापर्यंत रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्येचे निर्णय घेतात. अशीच एक महिला रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी धावत होती. मात्र, सुदैवाने रेल्वे पोलीसमधील ASI रवींद्र सानप आणि मोटरमनने तिचा जीव वाचवला आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ रेल्वे पोलिसांनी शेअर केला आहे.

नेमकं काय घडलं -

एका महिला आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून लोकलच्या दिशेने धावत सुटली होती. यावेळी तिला थांबण्यात तेथील अनेक प्रवाशांनी आरडाओरड सांगितले. मात्र, तिने कुणाचे ऐकले नाही. ती समोरुन येणाऱ्या रेल्वेच्या दिशेने धावत होती. यावेळी तिचा मृत्यू होणार, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, एवढ्यात त्याठिकाणी रेल्वे पोलीसचे एएसआय यांनी धाव घेत तिचा रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केले. सुदैवाने लोकलच्या मोटरमनने देखील ब्रेक लावला होता. म्हणून हा मोठा अनर्थ टळला. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

#HeroicAct

In a nail biting rescue,#RPF ASI Ravindra Sanap and motorman saved a woman attempting suicide by walking towards a local train on the same track at Byculla Railway Station.

We request all to not take such drastic steps.

We only get one life, make the most of it. pic.twitter.com/xRzgz1knXu

— RPF INDIA (@RPF_INDIA) August 29, 2022

हेही वाचा - गणेशोत्सव काळात पुण्यात दारूबंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात काय सांगितलं?

रेल्वे पोलिसांनी काय म्हटले - 

रेल्वे पोलीसचे ASI रवींद्र सानप आणि मोटरमनने भायखळा रेल्वे स्थानकावर त्याच ट्रॅकवरून लोकल ट्रेनकडे चालत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाचवले. आम्ही सर्वांना विनंती करतो की, अशी कठोर पावले उचलू नका. आपल्याला फक्त एकच आयुष्य मिळते, त्याचा पुरेपूर फायदा घ्या, असे आवाहनही रेल्वे पोलिसांनी केले आहे.

First published:

Tags: Mumbai, Shocking video viral, Sucide attempt