रेल्वे अधिकारी सरसावले, 5 वर्षांच्या चिमुरड्याच्या जीवासाठी पुण्याहून बेळगावला पोहोचवली मदत

रेल्वे अधिकारी सरसावले, 5 वर्षांच्या चिमुरड्याच्या जीवासाठी पुण्याहून बेळगावला पोहोचवली मदत

सध्या कोरोनामुळे लोकांसमोर अनेक संकटं उभी राहिली आहेत. मात्र चांगली बाब म्हणजे मदतीचा हात पुढे करणारेही अनेक आहेत

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर वाढत आहे. त्यामुळे 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्या असून लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. याचा हातावर पोट असणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अशातच रेल्वे गरजुंच्या मदतीला धावून आली आहे. बंगळुरुतील 5 वर्षीय मुलाचं औषध रेल्वे विभागाने थेट पुण्यात पोहोचवलं आहे. याबाबत रेल्वेच्या दक्षिण पश्चिम विभागाने परिपत्रक जारी केलं आहे.

बेळगावातील एका 5 वर्षीय मुलावर पुण्यातील डॉक्टर उपचार करीत होते. मात्र डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध बेळगावात सहज उपलब्ध होत नसल्याने पालकांसमोर मोठा प्रश्न पडला होता. याबाबत मुलाच्या आई-वडिलांनी पुण्यातील नातेवाईकांना गाडीने औषध घेऊन बेळगावात येऊ द्या, अशी मागणी करणारं पत्रक महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र ही मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यानंतर मुलाच्या पालकांनी बेळगावचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे मागणी केली.

अखेर अंगडी यांनी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी संबंध साधला. आणि मुलाचं औषध मालगाडीने बेळगावपर्यंत पोहोचले याची व्यवस्था करून दिली. यानंतर पुण्यावरुन निघालेलं हे औषध बेळगावर रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेतलं व मुलाच्या पालकांकडे सुपूर्द केली. यापूर्वी राजस्थानातील एका मुलासाठी रेल्वे धावून गेली होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी लोकांना कठीण प्रसंगाता तोंड द्यावं लागतं आहे. मात्र अशा प्रसंगातही लोकप्रतिनिधी आणि विविध सरकारी विभागातील अधिकारी धावून येत आहेत.

संबंधित -पाकिस्तानचे PM करणार कोरोनाची चाचणी, पॉझिटिव्ह व्यक्तीच्या आले होते संपर्कात

मुंबईत पुन्हा मोठी वाढ, 24 तासांत 419 नवे कोरोनाचे रुग्ण; राज्याचा आकडा 5000 पार

First published: April 21, 2020, 10:18 PM IST

ताज्या बातम्या