आवडत्या खेळानेच घेतला जीव, मित्राने डोक्यात बॅटने मारल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

आवडत्या खेळानेच घेतला जीव, मित्राने डोक्यात बॅटने मारल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

पेणमधील राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावर असणाऱ्या मंगेश दळवी यांचा 13 वर्षीय मुलगा प्रेम दळवी याचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

रायगड, 10 जानेवारी : रायगड जिल्ह्यातील पेण इथं सोसायटीत क्रिकेट खेळताना झालेल्या वादात एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पेण शहरामधील मन हेलावून टाकणारी ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

क्रिकेट म्हणज भारतात गल्लोगल्ली खेळला जाणारा खेळ. पेण शहरातील कुंभारआळी सद्गुरू पार्क येथे सोसायटीमधील मुलांचा असाच एक क्रिकेटचा डाव रंगला होता. यावेळी दोन मुलांमध्ये किरकोळ वाद झाला आणि नंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. अशातच रागाच्या भरात एका मुलाने दुसऱ्याच्या डोक्यावर बॅटने जोरदार प्रहार केला. यामध्ये पेणमधील राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावर असणाऱ्या मंगेश दळवी यांचा 13 वर्षीय मुलगा प्रेम दळवी याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - आई आणि मुलाचा मृतदेह सापडला रक्ताच्या थारोळ्यात, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

पेण सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रेम दळवी याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी आणला असता परिसरात प्रचंड गर्दी जमली होती. स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलीसांकडून हॉस्पिटलबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अवघ्या 13 वर्षांचा मुलगा गमावल्याने दळवी कुटुंबाने मोठा आक्रोश केला.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे पेण शहरात खळबळ उडाली आहे. लहान मुलांकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज या संपूर्ण प्रकारामुळे अधोरेखित झाली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 10, 2021, 6:37 PM IST

ताज्या बातम्या